BREAKING NEWS
Search

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चार मुलांना उच्च शिक्षित व पदाधिकरण्याचे कार्य – कवठे येमाईच्या सावकार मुलमुले या शेतकऱ्याचे कार्य इतरांसाठी नक्कीच आदर्शवत – प्रा. संभाजी साबळे   

477
शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,मुख्य संपादक) – शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला शेतकरी माणूस सावकार मुलमुले यांनी आपल्या 2 पत्नीसोबत संसाराचा गाडा चालवला. घरी शेतजमीन भरपूर होती.  मात्र पाण्याविना काहीही करता येईना. शेतजमिनीसाठी पाण्याची सोय करावी तर पैसै आणायचे ? कुठून हा प्रश्न डोळ्यासमोर उभा राहत असे. शेतीला जोडधंदा म्हणून दूग्धव्यवसाय सुरू केला.त्यावरच घर, प्रपंच चालवत असे,पुढे मुले हळूहळू प्राथमिक,माध्यमिक व उच्च शिक्षणाकडे वळू लागली. पैशाशिवाय उच्च शिक्षण पूर्ण होणे शक्य नव्हते म्हणून शेतजमिनीवर कर्ज काढून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. योगेश,दत्तात्रय,काशिनाथ व समाधान या ४ मुलांनी आपल्या आई वडिलांचे काबाडकष्ट डोळ्यासमोर पाहत जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. थोरला मुलगा योगेश हा कालच महाराष्ट्र राज्य लोकशाही आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाला आहे तर दुसरा मुलगा दत्तात्रय हा एमबीबीएस.पदवी प्राप्त करून अकोला येथे एम डी या उच्च पदवीचे शिक्षण घेत आहे.तसेच तिसरा मुलगा काशिनाथ हा पुण्यात सिव्हिल इंजिनिअर पदवी प्राप्त करून स्पर्धा परीक्षा देत आहे आणि चौथा मुलगा समाधान हा बी डी एस चे शिक्षण घेत आहे.अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत जिद्द,चिकाटी व मेहनतीच्या जोरावर चार मुलांना उच्च शिक्षण देऊन अधिकारी घडवण्याची किमया साधली आहे ती कवठे येमाईच्या गणेशनगर परिसरात वास्तव्यास असणारे गरीब व नम्र शेतकरी सावकार मुलमुले त्यांची ही जीवनगाथा इतरांसाठी नक्कीच आदर्श असल्याचे मत प्रा. संभाजी चंद्रकांत साबळे यांनी सा.समाजशील शी बोलताना व्यक्त केले आहे.
आजच्या महागाईच्या काळात एखाद्या कुटुंबाला २ मुलांचे शिक्षण व आरोग्य सांभाळत प्रपंच करणे किती जिकरीची गोष्ट असते.परंतु याला अपवाद ठरले आहेत कवठे येमाई गावचे सावकार मामा मुलमुले. शांत ,प्रेमळ आणि नम्र स्वभावाने समाजातील अनेक व्यक्तीशी त्यांची नाळ जोडली गेलेली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *