Search

19 ज्येष्ठ नागरिकांचे बाबूराव साकोरे सर यांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन अभिष्टचिंतन

273

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिक्रापूर गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व जोगेश्वरी माता मंदिर सभा मंडपामध्ये ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र शिक्रापूर या संस्थेचा मासिक कार्यक्रम शनिवार दिनांक 8 जून 2024 रोजी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. मे आणि जून या महिन्यांमध्ये ज्या 19 ज्येष्ठ सभासदांचे जन्मदिन होते, त्या सर्वांना संस्थेतर्फे कार्यक्रमाचे अध्यक्ष व गुरुवर्य श्री साकोरे सर यांचे शुभ हस्ते गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले. 19 मान्यवर ज्येष्ठांचे वाढदिवसाचे औचित्य साधून शिरूर येथील सुप्रसिद्ध गायक व संगीतकार श्रीहरी मेंदरकर व त्यांचे सहकलाकार यांचा सुमधुर भक्ती गीते, भावगीते, गझल आणि चित्रपट गीत गायनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास उपस्थित रसिकांकडून भरभरून दाद मिळाली. विरंगुळा केंद्रातील महिलांना भजनाची आवड असल्याने आणि या महिलांचे भजनी मंडळ असल्याने श्रीमती शिलावती खंडेराव करंजे यांनी मंडळाला साऊंड सिस्टिमचा संच भेट दिला. तसेच श्री नारायण माधवराव मांढरे यांचे वाढदिवसानिमित्त त्यांच्या सुनबाई सौ मोहिनी ताई संतोष मांढरे यांच्या सौजन्याने उपस्थित सर्व सभासदांना अल्पप आहाराचे वाटप करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा सौ रेणुका सुरेश थिटे व श्री सुरेश थिटे यांच्या 42 व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे सुपुत्र श्री अक्षय थिटे व मयूर थिटे यांचे कडून सुगम संगीत रजनी कार्यक्रमाचे सौजन्य मिळाले. वरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवृत्त मुख्याध्यापिका सौ जयश्री फुलावरे आणि श्री देवेंद्र कोळपकर यांनी केले.सौ साधनाताई जगताप यांनी कार्यक्रमांमध्ये संस्थेच्या मागील कार्यक्रमांचा संक्षिप्त आढावा घेऊन प्रशंसा केली आणि त्यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची उत्तमरीत्या सांगता झाली.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *