Search

नवीन क्षैक्षणिक वर्षतील शाळा सुरु – पिंपरखेडच्या दाभाडे मळ्यातील नव बालकांचे बैलगाडीतून मिरवणुकीने स्वागत 

361
शिरूर,पुणे (देवकीनंदन शेटे,संपादक) – उन्हाळ्याच्या सुट्टीत बंद असलेल्या शाळा २०२४-२५ या नवीन शैक्षणिक वर्षात आज शनिवार दि.१५ रोजी सुरू झाल्या.दाभाडे मळा (ता.शिरूर) येथील प्राथमिक शाळेत पहिले पाऊल ठेवणाऱ्या नवगतांचे सजवलेल्या बैलगाडीतून ढोल,ताशाच्या गजरात मिरवणूक काढून औक्षण करून, गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.सर्वच शाळांमध्ये पहिल्या दिवशीच मुलांना नवीन पाठ्यपुस्तके गणवेश वाटप करण्यात आले.चिमुकल्यांच्या किलबिलाटाने शाळा गजबजून गेल्याचे चित्र सर्वच शाळांमध्ये पहायला मिळाल्याचे दाभाडे मळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आबासाहेब पोखरकर यांनी सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
     शाळेचा पहिला दिवस शनिवार असल्याने सकाळी सात वाजताच मुले शाळेच्या आवारात हजर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.शिरूरच्या बेट भागातील पिंपरखेड, जांबूत, काठापूर, चांडोह,फाकटे,वडनेर या गावातील जिल्हा परिषद शाळा तसेच विद्यालयातील नवीन विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व विद्यालयातील मुलांना आज पहिल्या दिवशीच पाठ्यपुस्तके देण्यात आली.
दाभाडेमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली मध्ये प्रवेश घेतलेल्या नऊ नवगतांचे फेटा बांधून सजवलेल्या बैलगाडीतून ताशांच्या गजरात वाजतगाजत मिरवणूक झेंडूच्या पाकळ्यांची उधळण करत, गुलाबपुष्प व पाठ्यपुस्तके देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आबाजी पोखरकर, रामदास दाभाडे,फकिरा दाभाडे,मुख्याध्यापिका कल्पना निचित, तानाजी पोखरकर,कैलास थोरात, ज्ञानेश्वर पोखरकर, सुजाता दरेकर,अलका दरेकर,लिलाबाई दाभाडे,अशोक दाभाडे,विजय दाभाडे, मच्छिंद्र  दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.बेटभागातील सर्वच जिल्हा परिषद शाळांमध्ये मुलांचे स्वागत करून पुस्तके वाटप करण्यात आली. पहिल्या दिवशीच हातात नवीन पुस्तके,गणवेश मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण आनंद दिसत होता.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *