Search

शिरूरला जागतिक रक्तदाता दिन साजरा –  रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेचा उपक्रम 

224

शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक)“द्रव्यदानं परम दानम् ! अन्नदानं ततोधिकम् !  ततः श्रेष्ठ रक्तदानम् या काव्य पंक्तीप्रमाणे  रक्तदान हे श्रेष्ठ दान असून फार पुण्याचे काम आहे. चरकांच्या शास्त्राप्रमाणे जीवनदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्त म्हणजे जीव असे सुश्रुताचार्यांनी म्हटले आहे. त्यामुळे अगदी सामान्य व्यक्तीही रक्तदान करून दुसर्‍याचा जीव वाचवू शकते.जागतिक रक्त संक्रमणामध्ये रक्तदानाची चळवळ महत्वपूर्ण ठरत आहे.

१४ जुन हा जागतिक रक्तदाता दिवस म्हणून साजरा केला जातो . जे लोक स्वैच्छिक रक्तदान करून जीवनदान करतात त्यांचे आभार मानणे व नवीन लोकांना रक्तदानासाठी प्रवृत्त करणे असे या दिवसाचे उद्दिष्ट ठरवलेले आहे. रक्तदान केल्यास आपणास काहीही त्रास होत नाही, हे सांगणेही आवश्यक आहे.सुरक्षित रक्त रुग्णाला मिळवून देण्यासाठी स्वैच्छिक रक्तदान महत्वाचे ठरते असे मत रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या राणी (अश्विनी) कर्डिले यांनी व्यक्त केले.त्या शिरूर येथे रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित  जागतिक रक्तदाता दिन प्रसंगी बोलत होत्या.
सध्याच्या धकाधकीच्या काळात बर्‍याच ठिकाणी छोट्या मोठ्या अपघातात, ऑपरेशनच्या वेळी, रक्ताची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यावर रक्तदान हाच एक उपाय आहे आणि तो आपण करू शकतो. आजच्या दिनी कोणतीही अपेक्षा न करता दर तीन महिन्यास मी रक्तदान करेन, असा संकल्प करावा.संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी स्वतः १३ वेळा रक्तदान केले असून यापुढेही नेहमी रक्तदान करत रहाणार असे त्यांनी ​सा.समाजशील शी बोलताना सांगितले.
यावेळी शिरूर शहरातील सर्वात जास्त वेळा ज्यांनी रक्तदान केले त्यांचा रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीफळ ,गुलाब पुष्प,शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये निलेश खाबिया यांनी ६८ वेळा,वैशाली खाबिया १५ वेळा, मीत खाबिया यांनी १० वेळा,सामाजिक कार्यकर्ते अनिल बांडे ६२ वेळा रक्तदान केलेलं असुन आम्हा सर्वांना रक्तदानाचे शतक करावयाचे आहे असे आवर्जून सांगितले. यावेळी डॉ. स्मिता कवाद,गीता आढाव,अनुपमा दोषी,शीतल शर्मा उपस्थित होते. संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी सर्वांचे आभार मानले.
– सुभाष शेटे,९९७५६७४२८६Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *