Search

राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या दिमाखात स्वागत

172

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : आज दिनांक 16 जून 2024 रोजी शिक्रापूर या ठिकाणी स्वराज्य जननी राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या पालखी सोहळ्याचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. हा पालखी सोहळा राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ सिंदखेड राजा (बुलढाणा) ते समाधीस्थळ पाचाड (रायगड) या ठिकाणी दर वर्षी जात असतो.याही वर्षी या पालखीचे मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात शिक्रापूर नगरीमध्ये स्वागत करण्यात आले. या पालखीच्या स्वागताच्या निमित्ताने ग्रामपंचायत शिक्रापूरचे सरपंच रमेशजी गडदे, उपसरपंच सौ.सारिकाताई सासवडे, ग्रा.पं. सदस्य सौ.मोहिनीताई सासवडे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.मंगलताई सासवडे, ग्रा. पं.सदस्य श्री.त्रिनयन कळमकर, भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ मांढरे व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी लखोजी राजे जाधव यांचे वंशज श्री.शिवाजी राजे जाधव बोलताना म्हणाले की या ठिकाणी हा झालेला सन्मान सोहळा निश्चित स्वरूपात कौतुकास्पद आहे. व जिजाऊंचा जीवन गौरव उलगडणारा आहे. येणाऱ्या काळामध्ये या पालखी सोहळ्याचे स्वरूप आणखी व्यापक स्वरूपात झालेले असेल. या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत शिक्रापूर चे सरपंच श्री.रमेश गडदे यांनी पुढील काळामध्ये या पालखीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तर भैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.राजाभाऊ मांढरे यांनी जिजाऊंच्या या पालखी सोहळ्याचे कौतुक करून शिवछत्रपतींच्या काळातील विविध सरदार घराण्याचा गौरव केला. या पालखी सोहळ्यासाठी सर्वच शिवभक्तांनी संयोजक म्हणून काम पाहिले ज्यामध्ये शिवश्री.शरद पाटील दरेकर, उद्योजक श्री.विशाल पाबळे, उद्योजिका सौ.नंदाताई भुजबळ, सामाजिक कार्यकर्त्या सौ.अलकाताई जोगदंड, रोहीनीताई दरेकर,
श्री.किरण ढमढेरे, वैभव ढमढेरे, शिवाजी घोडे, राहुल पाबळे, निलेश गुंड,  अनिकेत पाबळे, सचिन शिंदे, माऊली पाबळे, सुमंत शेळके या सर्वांनी उत्तम नियोजन केले तर याप्रसंगी झालेल्या सन्मान सोहळ्याबद्दल सर्वांनीच आनंद व्यक्त केला व जिजाऊंच्या कार्यकर्तृत्वाचा या ठिकाणी जागर करण्याचा मनोदय व्यक्त केला.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *