Search

कवठे येमाई त पुन्हा एकदा धाडसी चोरी – सुमारे पावणे तीन लाख रुपयांचे साहित्य लंपास – पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप

1619

शिरूर,पुणे (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील अष्टविनायक महामार्गावरील कवठे येमाई त आज पहाटे दोनच्या दरम्यान महामार्गालगत असणारे श्री गणेशा ट्रेडर्स हे बिल्डिंग मटेरियल सप्लायरचे दुकान मुख्य दरवाजा व शटर उचकटून टाकत आतील पत्रे,जाळी इनव्हर्टर,बॅटरी,सीसीटीव्ही,रिसिव्हर तोडून व इतर साहित्य असा सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा माल चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत दुकानाचे मालक बाळासाहेब गावडे,निखिल मिडगुले यांनी ही माहिती दिली..तर पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यानुसार एक लाख एकेचाळीस हजार रुपयांचे साहित्य या घटनेत चोरीस गेल्याचे पोलीस निरीक्षक गुंजवटे यांनी सांगितले .
गावडे व मिडगुले यांनी दिलेल्या माहिती नुसार ते संध्याकाळी दुकान बंडकारून घरी गेले होते. सकाळी हार देणार्या व्यक्तीने चोरी झाल्याची माहिती त्यांना दिली. ते दोघेही तात्काळ दुकानाकडे आले. दुकानात व आतील बाजूस लावलेले सीसीटीव्हीची चोरटयांनी तोडफोड केली होती. दुकानाचे समोरील बाजूस असणाऱ्या दुसऱ्या दुकानाच्या सीसीटीव्हीत रात्री पावणेदोनच्या सुमारास एक पिकअप गाडी आतमध्ये दिसून आली. चोरट्यांनी चोरलेला सर्व माल या पिकामधूनच नेला असल्याचे गावडे यांनी सांगितले.गावडे यांनी दिलेल्या माहिती नुसार दुकानाचे सीसीटीव्ही,त्याचे मशीन,बॅटरीसह इनव्हर्टर,५० पत्रे,१० तारेचे जाळी बंडल,व इतर साहित्य मिळून सुमारे पावणे तीन तीन लाख रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबवले आहे.या घटनेबाबत शिरूर पोलिसांना माहिती देण्यात असून कवठे येमाई परिसरात सातत्याने होत असलेल्या विविध प्रकारच्या चोरीच्या घटना रोखण्यात पोलिसांना अपयश येत असून पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे युवाक्रांती पोलीस मित्र,ग्राहक व पत्रकार संरक्षण संघटनेचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष विलासराव रोहिले यांनी सांगितले. या घटनेचा परिसरात घडलेल्या डीपी चोऱ्या व इतर घटनांचा  तात्काळ छडा न लागल्यास या भागातले शेतकरी,व्यापारी,ग्रामस्थसांसह शिरूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्याचा इशारा कवठे येमाईचे माजी सरपंच बबनराव मारुती पोकळे यांनी दिला आहे.
तर रात्री कवठे येमाई येथे झालेल्या चोरीचा लवकरात लवकर तपास लावू व यातील आरोपी गजाआड करू असे आश्वासन शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिले आहे.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *