Search

वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चास फाटा – कवठे प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटप 

384
शिरूर,पुणे : (प्रा.देवकीनंदन शेटे,संपादक) – भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनावश्यक खर्चास फाटा देत कवठे येमाईचे माजी सरपंच दीपक रत्नपारखी व युवानेते भाऊसाहेब घोडे यांनी कवठे येमाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील २५४ विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठीआकर्षक वह्या,पेन सप्रेम भेट दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख सखाराम फंड यांनी केले.
       सकाळी साडेअकरा वाजता झालेल्या या विधायक व स्त्युत्य कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य,सर्व शिक्षक,शिक्षिका,ग्रामपंचायत सदस्य सुभाष उघडे,सनी रेणके,निलेश पोकळे,रामदास पोकळे,आनंदा रोहिले,नामदेव येडे,संतोष चिद्दरवार,हेमंत कर,वैभव दळवी,अनिकेत रेणके,नवनाथ सांडभोर व मान्यवर ग्रामस्थ,पालक उपस्थित होते.
    दरम्यान आज शाळेत सकाळी आठ नंतर योग दिवस ही साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांना सुदृढ आरोग्य,मजबूत शारीरिक क्षमता राखण्यासाठी व्यायामाबरोबर योग धारणा किती महत्वाची असते याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना विविध योगासने,प्राणायाम,सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिकांसह माहिती व योगाचे महत्व सांगण्यात आल्याचे मुख्याध्यापक फंड यांनी ​सा.समाजशील शी बोलताना सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *