Search

विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी अखेर गजाआड – पुणे एलसीबी व शिरूर पोलिसांची संयुक्त कारवाई – तब्बल ४८ गुन्हे उघडकीस

360
​शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे<कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यासह इतरत्र ही विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरी करणारी टोळी जेरबंद करण्यात पुणे एलसीबी व शिरूर पोलिसांना यश आले असून या टोळीकडून तब्बल  ४८ गुन्हे उघडकीस आले असून ५०० किलो तांब्याच्या पट्टया व तारांसह गुन्हयात वापरलेली वाहने जप्त करून एकूण रू. १४,५०,०००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलेआहे.शिरूर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी ही धडक कारवाई केली असल्याची माहिती शिरूरचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी दिली.
पुणे जिल्हयातील  ग्रामीण भागातील शिरूर, दौंड उपविभागात मागील महिन्यात विद्युत रोहीत्र (ट्रान्सफॉर्मर) चोरीचे प्रमाण वाढले होते. त्याअनुषंगाने गुन्हे दाखल करण्यात आले होते.विद्युत रोहीत्र चोरी गेल्याने परीसरातील शेतक-यांच्या पिकांचे नुकसान होत असे, तसेच परीसरात अंधार राहत असल्याने इतर चोरीच्या शक्यता वाढत होत्या.विद्युत रोहीत्र हे दुर्गम भागात असल्याने चोरी झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, सीसी टीव्ही या द्वारे तपास होणे अवघड होते.पोलीस अधीक्षक  पुणे ग्रामीण यांनी सदर गुन्हयाचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर विभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची बैठक घेवून गुन्हे घडलेली ठिकाणे, गुन्हयांची वेळ, गुन्हयांची कार्यपद्धती याचा आढावा घेवून योग्य ते मार्गदर्शन करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सुचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके तयार करण्यात आली होती.
          तपास पथकांनी शिरूर पोलिसांच्या मदतीने गुन्हांचे घटनास्थळे पडताळून घटनास्थळाकडे नेणारे जाणारे रोडवरील सोसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून त्यांच्या सध्याच्या हालचालीवर लक्ष केंद्रीत करून तपास चालू केला. सदरचे गुन्हे हे रेकॉर्डवरील आरोपींनी केले असल्याचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने संशयित आरोपींना ताब्यात घेण्याचे अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची तीन तपास पथके रवाना करण्यात आली. विद्युत रोहीत्र चोरणारी टोळी ही तळेगाव ढमढेरे परिसरात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाल्याने तपास पथकांनी सापळा रचून आरोपी तामे विशाल खंडू पवार वय २५ धंदा जेसीबी चालक तांबेवाडी वडगाव सावताळ ता .पारनेर ,जि अहमदनगर, प्रदीप राजेंद्र शिंदे वय २६ धंदा ड्रायव्हर रा साकूर गाडेकर ता. संगमनेर अहमदनगर,ओमकार अजित घोडेकर, धंदा ड्रायवर रा साकुर घोडेकर मळा ता संगमनेर जि अहमदनगर, आदेश सयाजी भुजबळ वय १९ धंदा शेती रा साकुर हळदावस्ती ता .संगमनेर, जि अहमदनगर,हर्षल राजेंद्र शिंदे वय २४ धंदा शेती रा साकूर गाडेकरमळा ता. संगमनेर जि अहमदनगर, श्रीकांत शिवाजी जाधव वय २२ धंदा मासेमारी विक्री रा .सातकरवाडी दहीवडी ता शिरुर जि पुणे, करण नाना माळी वय १९ धंदा शेती रा दहिवडी मांजरेवस्ती ता शिरुर ,जि पुणे मूळ रा.वांगदरी ता श्रीगोंदा जि. अहमदनगर,सोनू विकास धुळे वय २८ धंदा मजूरी रा. आंबळे ता शिरुर जि पुणे मूळ गाव वाडेबोल्हाई थेऊर ता. हवेली, जि पुणे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले असून त्यांनी गुन्हयातील चोरी केलेला माल आरोपी नामे  दिपक पांडुरंग सांगळे वय २७ धंदा भंगारविक्री रा व्हाईटहाउस बोलेगाव फाटा नागापूर ता. जि .अहिल्यानगर यास विक्री केला असल्याचे सांगितल्याने त्याला सुद्धा गुन्हयाचे कामी ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीनी गुन्हा करण्यासाठी पिकअप चारचाकी वाहनाचा तसेच दुचाकी वाहनांचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाल्याने सदरचे पिकअप चारचाकी वाहन, सहा मोटार सायकल जप्त करणेत आलेल्या असून त्यापैकी एक मोटार सायकल चोरीची आहे. तसेच गुन्हयात चोरी केलेल्या मालापैकी ५०० किग्रॅ वजनाच्या तांब्याच्या पट्टया व तारा हस्तगत करण्यात आलेल्या असून एकूण १४,५०,०००/- (१४ लाख ५० हजार रूपये) किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ४८ गुन्हे उघडकीस आलेले आहेत.गुन्हयातील आरोपी विशाल पवार याच्यावर एकूण ११ मालमत्ता (मोटार सायकल) चोरीचे गुन्हे दाखल असून आरोपी प्रदीप शिंदे याचेवर ०३ गुन्हे दाखल असून तो ओतूर पोलीस स्टेशनकडील चोरीचे गुन्हयातील फरार आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक  पंकज देशमुख, पुणे ग्रामीण, अपर पोलीस अधीक्षक  संजय जाधव, बारामती विभाग,  अपर पोलीस अधीक्षक  रमेश चोपडे, पुणे विभाग,  एस.डी.पी.ओ.  प्रशांत ढोले, शिरूर विभाग,  एस.डी.पी.ओ.  स्वप्निल जाधव, दौड विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस स्टेशनचे पो.नि. ज्योतीराम गुंजवटे  स्था.गु. शा.चे सपोनि राहूल गावडे, योगेश लंगुटे, पोसई अभिनीत साकंद, पोसई एकनाथ पाटील स्था.गु.शा कडील अंमलदार तुषार पंदारे, दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीण, अतुल डेरे, सचिन घाटगे, अजित भुजबळ संजू जाधव, मंगेश नागरगोजे, स्वप्निल अहीवळे, विजय कांचन, संदीप वारे , अमोल शेडगे, धिरज जाधव, सागर धुमाळ, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय सुपे, हनुमंत पासलकर, दत्ता तांबे, रामदास बाबर, राहूल पवार, विनोद पवार, समाधान नाईकनवरे, तुषर भोईटे, मंगेश भगत, मपोना सुजाता कदम शिरूर पो स्टे चे नितीन सुद्रीक, परशुराम सांगळे, नाथा जगताप, रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, शिक्रापूर पो स्टे कडील अंमलदार किशोर तेलंग, प्रशांत गायकवाड, प्रतिक जगताप, यांनी केली असून आरोपी सध्या पोलीस कस्टडी रिमांड मध्ये असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *