Search

सरपंच बापूसाहेब काळे यांच्या संकल्पनेला साद घालून निमगाव म्हाळुंगी मध्ये वृक्ष लागवड

190

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीचे सरपंच बापूसाहेब काळे यांच्या १० हजार झाडे लावण्याच्या संकल्पनेला साद घालून झाडे दत्तक योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक वृक्षदत्तक दात्यांनी वृक्ष दत्तक दिले होते. त्याझाडांची निमगाव म्हाळुंगी येथील विद्या विकास मंदिर आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक,विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी लागवड करण्यात आली. साखर कारखान्याचे ऊस विकास अधिकारी दिपक रोडे यांनी शाळेतील उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून सामूहिक वृक्षप्रतिज्ञा सादर करून वृक्ष लागवडीस सुरूवात केली.
सदर वृक्ष लागवडचा शुभारंभ शिरूर तालुक्याचे माजी आमदार, श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांतकाका पलांडे, पंचायत समिती सदस्य विजयदादा रणसिंग, हायटेक प्लास्ट चे विनोद राऊत, आर्ट ऑफ लिव्हिंग चे तुकाराम जावळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिरूर तालुका गट विकास अधिकारी महेश डोके यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे, विद्या विकास मंदिर विद्यालयाचे प्राचार्य संजीव मांढरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब साकोरे, मारुती निकम, आर्ट ऑफ लिव्हिंगचे अजित रणसिंग, ग्रामविकास अधिकारी गुलाबराव नवले, कृषी अधिकारी जयश्री रासकर, तलाठी शांताराम सातपुते,धनंजय लांडगे,ग्रामपंचायत कर्मचारी, विद्यार्थी व ग्रामस्थ यावेळी मोठया प्रमाणावर उपस्थित होते. निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी प्रास्ताविकामध्ये ग्रामपंचायत ने पुकारलेल्या झाडे दत्तक योजनेच्या आवाहनाला भरभरून साथ देवून झाडे दत्तक देणाऱ्या सर्व दात्यांचे तसेच या योजनेला सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञातांचेही मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकुंदराव ढोकले सर यांनी केले. विद्या विकास मंदीर विद्यालयाचे प्राचार्य संजीव मांढरे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *