Search

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या उपस्थिती राऊतवाडी येथे सोयाबीन शेतीशाळा संपन्न

219

शिक्रापूर, ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : राऊतवाडी येथे राज्य पुरस्कृत एकात्मिक सोयाबीन प्रकल्प योजना सन 2024-25 अंतर्गत सोयाबीन शेतीशाळा संपन्न झाली. जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मा.श्री संजयजी पाटोळे यांच्या उपस्थितीत ही शेतीशाळा घेण्यात आली. शेतीशाळेची सुरुवात प्रतिज्ञाने झाली व आजचा शेतीशाळेचा विषय एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक तन व्यवस्थापन याविषयी सविस्तर मार्गदर्शन कृषी सहायक अशोक जाधव यांनी उपस्थित शेतीशाळेतील शेतकऱ्यांना दिली. त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न उत्तर कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी व प्रश्नांना तज्ञमार्फत समाधान करण्यात आले तसेच प्रशिक्षणवर्गानंतर सोयाबीन प्रक्षेत्र भेटीदरम्यान शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळील पुरवलेल्या शेतीशाळा किटस च्या माध्यमातून विविध किडी, अळ्या व रोगग्रस्त झाडे गोळा करून शेतीशाळा वर्गात घेऊन आले व विविध इसा निरीक्षणे, तणनिरीक्षणे, ओलावा निरीक्षणे शेतकऱ्यांनी घेतले व त्यावर शंका समाधान चर्चा मार्गदर्शन शेतीशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना करण्यात आले. या शेती शाळेसाठी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे, शिक्रापूर नगरीचे प्रथम नागरिक सरपंच रमेशजी गडदे, मंडल कृषी अधिकारी सुनील मोरे, कृषी पर्यवेक्षक संतोष जगताप व प्रगतशील शेतकरी बबन वाघोले, संपत राऊत, एकनाथ राऊत, मारुती राऊत, राघू राऊत, दीपक गायकवाड, पोपट गायकवाड, सिताराम राऊत, राजू भूमकर, हनुमंत राऊत, कचरू राऊत, संभाजी बालवडे, सुदर्शन डोमाळे, महादेव गायकवाड, कैलास मांढरे, अंकुश हिरवे, सतीश वाघोले, तुकाराम राऊत, खंडेराव खरपुडे, भरत म्हेत्रे, दिलीप वाबळे, गोपीचंद राऊत, कानिफ वाघोले, दत्तात्रय राऊत, संजय राऊत उपस्थित होते. शेवटी कृषीमित्र तानाजी राऊत यांनी शेतीशाळेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांचे व सर्व प्रमुख पाहुण्याचे आभार व्यक्त केले.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *