BREAKING NEWS
Search

पुणे : शिवस्वराज मित्र मंडळ आणि कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मा वाटप, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

777
            पुणे : पुणे महानगरपालिका प्रभाग क्र.४० मध्ये रविवार दि १६ रोजी शिवस्वराज मित्र मंडळ आणि कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी,मोफत चष्मा वाटप, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया  शिबीर घेण्यात आले. या वेळी चंद्रभागा नगर, भारती विद्यापीठ परिसरातील १९८ लोकांनी नावनोंदणी करून नेत्र चिकित्सा केली. यापैकी ४८ लोकांना मोफत चष्मे व १९ लोकांना अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. या नेत्र शिबिरातून समाजातील गरजू लोकांपर्यंत नेत्र बद्दलची जनजागृती केली  गेली . यावेळी भागातील अनेक लोकांनी या नेत्र शिबिराचा लाभ घेतला.या त्यांच्या नेत्रविषयी योग्य ती माहिती व्हावी तसेच त्यांच्या नेत्रविषयीच्या समस्या दूर व्हाव्यात याहेतूने या नेत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अमर पवार यांनी बोलताना सांगितले  तसेच ते पुढे मानले मंडळाने वेळोवेळी समाज-उपयोगी कार्य करून आपले नाव परिसरात उंचावले आहे.
     शिबिरासाठी नेत्र तज्ञ डॉ.सुनिता ताई मोरे व डॉ. रविंद्र मोरे यांचे मोलाचे योगदान मिळाले .यावेळी आमचे मार्गदर्शक आ.भा. मराठा महासंघाचे अध्यक्ष श्री. युवराज दिसले, एकता युवक ट्रस्टचे श्री. नाना निवंगुणे, भरती विद्यापीठ जेष्ठ नागरिक संघाचे श्री. शंकरराव पाटील, भोईटे काका, मोहनराव खैरे, हे उपस्थित होते. संकल्पना मंडळाचे अध्यक्ष अमर पवार यांनी केली. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते निलेश सांगळे, विक्रम गोडसे, प्रणव शिंदे, प्रविण गोगावले, मानस कोंढरे, आशिष राऊत, सुशिल शिंदे, यश कोंढरे, शुभम नांगरे उपस्थित होते.
– प्रतिनिधी,सचिन दांगडे,(सा.समाजशील,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *