BREAKING NEWS
Search

निरा नरसिंहपुर,इंदापूर : मुंबईत बलुतेदार संस्थांच्या विविध मागण्यांसाठी दि.25 पासून धरणे आंदोलन – हर्षवर्धन पाटील यांचेशी संघर्ष समितीची चर्चा

561
          निरा नरसिंहपुर,इंदापूर : राज्यातील बलुतेदार ग्रामिण कारागीर संस्थांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य बलुतेदार ग्रामिण कारागीर संस्था संघर्ष समितीच्या वतीने मुंबईत आझाद मैदानावर दि.25 फेब्रुवारी रोजी मोर्चा, धरणे आंदोलन व प्रसंगी प्राणांतिक उपोषण करण्यात येणार आहे. बावडा येथे माजी सहकार मंञी हर्षवर्धन पाटील यांची शनिवारी (दि.2) संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी आदमाने यांनी शिष्टमंडळासह भेट घेऊन चर्चा केली.
         महाराष्ट्रातील 311 तालुक्यातील बलुतेदार ग्रामिण कारागीर संस्था गेल्या 10 वर्षांपासून बंद आहेत.या संस्थाच्या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्र्यांकडे मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र राज्य बलुतेदार ग्रामिण कारागीर संस्था संघर्ष समितीने पाठविले आहे.बावडा येथे हर्षवर्धन पाटील यांचेशी चर्चेत संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी आदमाने यांनी सांगितले की,राज्याचे  सहकारमंञी असताना  हर्षवर्धन पाटील यांनी राज्यातील बलुतेदार संस्थांना  रू. 79 कोटी 60 लाखाची कर्ज माफी करून मोठी मदत केली आहे.आंम्ही मुंबईत आझाद मैदानावर दि.25 फेब्रुवारी रोजी मोर्चा व धरणे आंदोलन व प्रसंगी बेमुदत उपोषण करणार असून हर्षवर्धन पाटील यांनी आंम्हास सहकार्य करावे. याप्रसंगी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी महाराष्ट्र राज्य बलुतेदार ग्रामिण कारागीर संस्था संघर्ष समितीस काॅग्रेस पक्षाच्या वतीने सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही दिली.
         केंद्र सरकारच्या पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या धर्तीवर ” महाराष्ट्र रोजगार  निर्मिती कार्यक्रम ” या नावाने ग्रामीण कारांगिरांकरीता रू.10 लाख मर्यादेपर्यंत अर्थ सहाय्य देऊन त्यामध्ये 35 टक्के अनुदान राज्य शासनाने द्यावे. राज्यातील बलुतेदार संस्थांना शेसनाने दिलेली 79 कोटी 60 लाख रूपये कर्ज माफीची रक्कम राज्यातील सर्व जिल्हा बॅंकांना वर्ग झाली आहे. परंतु बॅंकानी व्याजावर व्याजाची आकारणी करून आज अखेर बलुतेदार संस्थां थकबाकीत दाखविल्या आहेत.या कर्जमाफी रक्कमेतून बॅंकानी बलुतेदार संस्थांचे अंदाजे 22 कोटी रूपये जादा घेतले आहेत.तरी कर्जमाफीनंतर बॅंकांनी येणे दाखविलेल्या व्याजाच्या रक्कमा निरस्त कराव्यात,संस्थांना किरकोळ खर्चासाठी प्रति वर्षी रू.25 हजार मिळावेत.
       तसेच तालुका स्तरावर ग्रामीण वसाहती  स्थापन करण्याचा निर्णय घ्यावा, महाराष्ट्रात बलुतेदार संस्थांमध्ये सध्या फक्त 30 टक्के कर्मचारी राहीलेले आहेत त्यामुळे या संस्थांचे कामकाज ठप्प झाल्याने नोकर भरती करण्यात यावी. तालुक्यास्तरावर प्रत्येक संस्थाना स्वतःचे कार्यालय द्यावे,संस्थांच्या सभासदांना बॅंकाकडून कर्ज देण्याचे आदेश व्हावेत, या मागण्या संघर्ष समितीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनात केल्या आहेत. राज्यात 311 तालुक्यात 7 लाख सभासद आहेत.राज्यातील बलुतेदारांच्या मागण्यां मान्य व्हाव्यात याकरीता हर्षवर्धन पाटील यांनी सहकार्य करावे,असे प्रतिपादन यावेळी  महाराष्ट्र राज्य बलुतेदार ग्रामिण कारागीर संस्था संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजी आदमाने यांनी केले.
-प्रतिनिधी,बाळासाहेब सुतार,(सा.समाजशील,नीरा नरसिंहपुर)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *