Search

कोंढापुरी तलावामध्ये पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी सोडण्याची ग्रामस्थांची मागणी

494

शिक्रापूर,ता.शिरूर : कोंढापुरी मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून तलावामध्ये पाणीसाठा संपुष्टात आल्याने  शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असल्याने स्थानिक नागरिकांनी पाणी सोडण्याची  मागणी केली आहे. कोंढापुरी, रांजणगाव गणपती, शिक्रापूर या गावांतर्गत पिण्याच्या पाण्यासाठी  “पाणी पाणीपुरवठा योजना ”  सल्यामुळे पिण्यासाठी पाणी सोडणे आवश्यक आहे. मागील आवर्तनामध्ये कोंढापुरी तलावांमध्ये कमी प्रमाणात पाणी सोडलेले होते, त्यामुळे पाणीसाठा काही दिवसच शिल्लक राहिल्याने शेतमाल जळत असल्याने व पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या कोंढापुरी, गणेगाव, खंडाळे व  पंचक्रोशीमध्ये झालेली आहे. तरी तलावामध्ये पाणी सोडणे महत्त्वाचे असून लवकरात लवकर पाणी सोडावे अशी कोंढापुरी गावचे प्रगतशील शेतकरी भास्कर गायकवाड, कोंढापुरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शांताराम गायकवाड, अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते राहुल दिघे, संतोष गायकवाड आदी ग्रामस्थांनी मागणी केली आहे .

-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड,(समाजशील न्युज, शिक्रापूर)
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *