BREAKING NEWS
Search

जांबुत,शिरूर : शरदवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची हनुमान जयंतीस उत्साहात सांगता

1089
       जांबुत,शिरूर : शिरूरच्या बेट भागातील जांबूतच्या शरदवाडी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हनुमान जयंतीस मोठ्या उत्साहात करण्यात आली. रामनवमी व हनुमान जयंती निमित्त १३/४ २०१९ ते २०/४/२०१९ पर्यंत आयोजित सप्ताह काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दररोज सकाळी ४ ते ६ काकडा, ८ ते ११ पारायण, सायं.४ ते ६ हरिपाठ, ६ ते ७ प्रवचन, ८ ते १० किर्तन,रात्री ११ ते १ पर्यंत हरी जागर असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शनिवार दि.२०/४/१९ला ह.भ.प  म्हतारदेव आठरे पाटील ( पाथर्डी ) यांचे सकाळी १० ते १२ काल्याचे किर्तनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. अशी माहिती सप्ताह कमिटी व जांबूतचे उपसरपंच गणेश सरोदे यांनी दिली आहे.
– ब्युरो रिपोर्ट (सा.समाजशील)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *