BREAKING NEWS
Search

टाकळी हाजी,शिरूर : निघोज ता. पारनेर येथील व्यापाऱ्याचे गोडावून फोडून ५ लाखांच्या माल चोरी प्रकरणी पुणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा पोलीस निलंबित – पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांची कारवाई

987
            टाकळी हाजी,शिरूर : निघोज ता पारनेर येथील एका व्यापाऱ्याचे गोडाऊन फोडुन  सुमारे पाच लाख रुपयांच्यावर मालाची चोरी झाल्यांची घटना घडली असुन यामधील आरोपी व सुत्रधार हा एक पोलिसचं असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ माजली आहे. रक्षकच भक्षक झाल्याने जनतेमधे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.तर या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचा पोलीस नाईक पोपट गायकवाड याला पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तात्काळ निलंबित केले आहे.
पुणे व नगर जिल्हयांच्या हद्दीवर नगर जिल्हयातील निघोज या गावात रविवार दि १९ पहाटे ही घटना घडली असुन सी.सी.टीव्ही कॅमेरामधे हे खाकीमधील दरोडेखोर कैद झाल्यांने चोरीचे बिंग उघडे पडले आहे.  पोलिस दलांचा इज्जत वाचविण्यासाठी अनेक बडया पोलिस अधिकारी हे प्रकरण मिटविण्यासाठी दोन दिवस प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे. आरोपी हा पुणे ग्रामिण ( स्थानिक गुन्हे अन्वेशन ) मधे काम करीत असल्याने शिरूर, दौंड, शिक्रापुर, रांजणगाव गणपती , वाघोळी परीसरातील अनेक दोन नंबर वाल्यांच्या कुंडल्या त्यांना माहीत आहे. तसेच तो अनेक दोन नंबर धंदयात पार्टनर असल्याचे समजते.त्यामुळे परप्रांतीय लोकाना हाताशी धरून डल्ला मारण्यांचा गोरख धंदा त्यांनी मोठया जोरात सुरु केला होता व त्यामधुन वरिष्ठांची मर्जी राखत लाखोची कमाई दरमहा केली जात असल्याची चर्चा पोलिस दलात रंगली आहे.याबाबत मिळालेली माहीती अशी की, निघोज येथील एक व्यापारी यांचे मळगंगा मंदीरा जवळ मालाचे गोडाऊन आहे. शनिवारी हे पोलिस महाशय पाहणी करून गेल्याचे समजते.रविवारी पहाटे एक गाडी व त्यामधे दोन तरुणांना घेऊन आले. त्यांनी दोघांसह गाडी गोडाऊन समोर उभी करून जवळचं असलेल्या पोलिस स्टेशन जवळच्या रखवालांशी गप्पा मारल्या. त्यानंतर माल मिळाल्यांचे लक्षात येताच पोबारा केला. पोलिस शिपाई हा पुणे जिल्हयातील असुन त्यांचे नगर जिल्हयात काय काम होते ? तो कोणत्या चौकशीला गेला होता ? तसेच वरीष्ठांची परवानगी होती का ? असे अनेक प्रश्न गुलदस्त्यात आहेत. आपण चोरी केलीय, गुन्हा दाखल होणार आहे हे समजतात अनेक वरीष्ठ मंडळी, नेते, अधिकारी यांच्या मार्फत प्रकरण मिटविण्यासाठी मोठया दबावतंत्राचा वापर पारनेर पोलिस स्टेशनमधे करण्यात आल्याची चर्चा आहे.
खाक्या वर्दीमधील खंडणी व दरोडेखोर बहाद्दर पोलिस मधे मोठया प्रमानात झाल्यामुळे पोलिसांच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन,रक्षक चं भक्षक झाल्यांने सामान्य जनतेने न्याय मागायचा कुणाकडे  ? असा सवाल जनतेमधुन व्यक्त केला जात आहे.
 पोपट च्या पोपटपंचीच चर्चा
खाकीमधील या पोपट च्या अनेक कारनाम्यांच्या सुरस कहाण्यांची चर्चा खाकी मित्र मंडळात रंगली असुन, तरुण पणात चांगली जबाबदारी मिळाल्याने लक्ष्मी दर्शनामधुन सावकारकी, अनेकांच्या जमीनी लुबाडने, जुगार अडुयात पार्टनरशिप ते वाघोलीमधील एका मसाज पार्लर मधील लिलाच्या घंदयातही ही खाकी गुंतली असल्याची खमंग चर्चा सुरू आहे.
पुणे पोलीस अधीक्षकांकडून गायकवाड वर तातडीने निलंबनाची कारवाई 
  स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण मध्ये पोलीस नाईक म्हणून काम करणारे पोपट मुरलीधर गायकवाड यांनी वरिष्ठांची कोणतीही पूर्व परवानगी ना घेता दि. १९ मी रोजी मुख्यालय सोडून परस्पर अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज येथे साथीदार मित्रांच्या मदतीने दुस-या जिल्ह्यात जाऊन गोडाऊनचे कुलूप तोडून ५ लाख रुपये किमतीचा गुटका बेकायदेशीररीत्या आणून त्याची परस्पर विक्री केली.या प्रकरणाची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गंभीर दखल घेत आज दि. २२ रोजी पोलीस नाईक पोपट मुरलीधर गायकवाड यांचे वर्तन गुन्हेगारांशी संधान असल्याने त्यांना तात्काळ निलंबित केले आहे. या घटनेने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
– संजय बारहाते,(विशेष प्रतिनिधी,सा.समाजशील,टाकळी हाजी



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *