BREAKING NEWS
Search

पुणे : जागतिक योग दिना निमित्त बिग मिशन फौंडेशनतर्फे योग शिबिर संपन्न

375
    पुणे : जागतिक योग दिना निमित्त बिग मिशन फौंडेशनतर्फे योग शिबिर संपन्न झाले.  या शिबीरामध्ये योग शिक्षिका सौ फुलंब्रीकर यांनी सर्वांना योगाचे महत्व योग्य रितीने प्रात्यक्षिकांसह पटवून दिले. तर यावेळी उपस्थितांकडून त्यांनी योगाचे प्रात्यक्षिक करून घेतले.पुण्याच्या शनिवार पेठेतील मुरलीधर हॉल येथे हे योग्य शिबीर घेण्यात आले . या शिबिराला मोठाच प्रतिसाद मिळाला. योग्य शिबिरात सहभागी व उपस्थितांचे बिग मिशन फोंडेशनच्या वतीने  नितिन आवेकर,गिरिश ओक,महेश भट,सुकृत राजहंस व अभिषेक शाळीग्राम यांनी आभार मानले. हे शिबिर यशस्वी होण्याकामी नितिन आवेकर यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
– प्रतिनिधी,श्रुती भालेराव (सा. समाजशील,पुणे)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *