BREAKING NEWS
Search

शरीराप्रमाने मनही शुद्ध स्वच्छ ठेवायला वारीची गरज – ज्ञानेश्वर मिडगुले

884

राळेगण सिद्धी : माणूस कापड्यावर डाग पडू नये याची काळजी घेतो. अंगाला मळ लागू नये म्हणून जपतो परंतु मनाचं पावित्र्य राखण्यासाठी अध्यात्म, परमार्थ, पंढरीची वारी, यांची गरज आहे असे प्रतिपादन राळेगण सिद्धी येथील संत निळोबाराय विद्यालयात ज्ञानेश्वर मिडगुले यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करताना सांगितले. पिंपळनेर ते पंढरपूर या दिंडी सोहळ्यातील चिंचोली मोराची या दिंडी समवेत राहून दिंडी मार्गाकडेच्या शाळांमध्ये जाऊन श्रीमुक्ताई विश्वसेवा प्रतिष्ठान व प्रबोधन केंद्रातर्फे गेली सहा वर्ष विद्यार्थी प्रबोधनाचा उपक्रम राबविला जात आहे. मोबाइल, टीव्ही, डीजे व कुसंगतीने नवीन पिढी वाहवत चालली आहे. त्यांना वाचवण्यासाठी गावोगावी अखंड हरिनाम सप्ताह प्रमाणे तज्ज्ञ व्याख्यात्यांच्या मार्गदर्शनाचा सप्ताह आयोजनाची गरज असल्याचे मिडगुले यांनी सांगितले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *