BREAKING NEWS
Search

तांदळीत विषमुक्त कढीपत्ता पिकाची लागवड, संपूर्ण जैविक तंत्रज्ञानूतून गोविंद कळसकर साकारतायेत आरोग्यमय कढीपत्त्याची बाग

594

 तांदळी,शिरूर : (ब्युरो रिपोर्ट) – सध्या सर्वत्रच रासायनिक खतांचा वापर करून शेती उत्पादने घेण्याचा सर्वसामान्य शेतकऱयांचा कला असतो. परंतु यातून मानवी शरीरास अनेक हानिकारक संकटांचा सामना करावा लागत आहे. हीच बाब लक्षात घेत आता अनेक शेतकरी जैविक शेतीकडे वाळू लागल्याचे अनेक उदाहरणांतून पाहावयास मिळते.

शिरूर तालुक्यातील तांदळी हे छोटेसेच पण सधन व टुमदार बागायती गाव.येथील गोविंद केरू कळसकर यांनी त्यांच्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत पारंपरिक शेतीला फाटा देऊन आता जैविक पद्धतीने शेती करण्यास सुरुवात केली आहे. कढीपत्ता लागवड केलेल्या क्षेत्राची योग्य ती  मशागत करून डॉ.सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीचे तंत्रज्ञान वापरून कढीपत्ता पिकाची लागवड केली आहे. या शेती साठी त्यांनी पूर्णपणे जैवक खते वापरल्याने मिळणारे उत्पादन पूर्णपणे विषमुक्त व आरोग्यदायी मिळणार आहे. रासायनिक खतांची मात्रा वापरून उत्पादित झालेल्या शेती पिकांच्या सातत्यपूर्ण सेवनाने दिवसेंदिवस वाढत चाललेले रोगांचे प्रमाण हे मानवी शरीरास फारच हानिकारक ठरत आहे. आणि हीच बाब लक्षात घेत कळसकर यांनी जैविक शेती साकारताना कढीपत्ता सारखी विषमुक्त शेती करून या पिकातून एक उत्तम आरोग्य देण्याचा प्रयत्न केला आहे. गोविंद केरु कळसकर हे त्यांच्याच गावांमधील रघुनाथ वामनराव कळसकर सहकारी सोसायटी या सोसायटीमध्ये सचिव म्हणून नोकरी करतात. नोकरी पाहून ते आपल्या वडिलोपार्जित शेती मध्ये नैसर्गिक शेतीचे विविध पद्धतीने जीवामृत, गावरान गाईचे शेणखत, याव्यतिरिक्त ते त्यांच्या शेतामध्ये कुठलीही रासायनिक खते टाकत नाहीत.लवकरच या पिकातून त्यांना उपादान व उत्पन्न ही सुरु होईल. कळसकर यांनी सुरु केलेला विषमुक्त व आरोग्यमय जैविक शेतीचा हा प्रारंभिक प्रयत्न इतर शेतकऱयांसाठी नक्कीच आदर्शवत असा आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *