BREAKING NEWS
Search

मुरबाड जवळील तळ्याच्या वाडी जवळ बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी 

1117
     मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड शहरापासून चार ते पाच किलोमीटर वरील फणसोली तळ्याची वाडी येथील तरुणावर बिबट्याने आज सकाळी हल्ला केल्याने या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला असून उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
      या बाबत सविस्तर वृत्त असे की,शेतात लावलेल्या काकडीला पाणी भरण्यासाठी गेलेल्या अशोक हरी बरतड (२२) या तरुणावर बिबट्याने हल्ला केला. जीव वाचवण्यासाठी झाडावर चढताना बिबट्या ने पंजा मारला व त्यात तो जखमी झाला.त्याच्या किंचाळीमुळे बाजूच्या शेतातील माणसे धावल्याने बिबट्याने पलायन केले. मात्र या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यावरच हल्ला करून दहशत निर्माण केली आहे. अशोक यास तातडीने उपचारासाठी मुरबाड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याला उल्हासनगर सेंट्रल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगण्यात आले  वनखात्याच्या मुरबाड पूर्व भागातील शिरवली रेंज मध्ये हा प्रकार घडला. या विभागाचे वन अधिकारी भामरे यांनी घटनास्थळी पंचनामा केल्याची माहिती दिली. मात्र जखमी तरुणाचे नावही त्यांना माहित नसल्याने त्यांची याबाबतीतची उदासीनता दिसून आली. मुरबाड पासून जवळच घडलेल्या या प्रकाराने बिबट्या ची दहशत झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *