BREAKING NEWS
Search

मुरबाड बस आगारातील सुरक्षा प्रश्न ऐरणीवर,अनेक समस्यांनी ग्रासलाय एस टी आगार 

570
      मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुबंई ,कल्याण,माळशेज घाट मार्गावर असणारे मुरबाड आगार  सध्या अनेक समस्यानी ग्रासले असून प्रवाशी व चालक वाहक ,तसेच आगार व्यवस्थापन तारेवरची कसरत करताना दिसत आहे.  त्यात वाढत्या अपघात सत्रा मुळे प्रवासीही भयभीत झालेत.या समस्या सोडविण्यासाठी एस टी महामंडळ वरिष्ठ प्रशासन अपयशी ठरत असल्याचे बोलले जात आहे.
      मुरबाड आगर हा ग्रामीण भागातील आगार असल्याने व मुबंई ,कल्याण ,ठाणे येथे जाण्यासाठी बस हा एकमेव सुरक्षित पर्याय असल्याने कामगार , विध्यार्थी, व्यावसायिक वर्ग मोठया प्रमाणात बसचा वापर करतात. मात्र या आगारात बसेस ची संख्या कमी असल्याने नादुरुस्त वाहने ही वापरावी लागतात.जुन्या बसेस ची या आगारातील संख्या मोठी असल्याने प्रवाश्यांना खटारा गाड्या मधून जावे लागते. विध्यार्थी संख्या व पासधारकांची संख्या मोठी असतानाही उत्पन्न मिळवण्यासाठी स्थानिक फेऱ्या डावलून लांब पल्ल्याच्या मार्गावर बस सोडल्या जातात. स्थानिक बसेस न लागल्याने बस आगारात विध्यार्थी व प्रवाशी वर्गाची धावपळ सुरू असते. तर दुचाकी व चारचाकी वाहना सोबत अवैध रित्या बसणाऱ्या टोपलीवाला, व्यापारी वर्ग या मुळे चालक वर्गाला अनेक समस्या भेडसावतात. कर्मचारी कमी, दुरुस्ती साहित्याची कमतरता असताना आहे त्या परिस्थितीत वाहने रस्त्यावर येत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या सर्व बाबी अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास येऊनही दुर्लक्ष होत असल्याने आपघाताना निमंत्रण मिळत असल्याचे बोलले जात आहे. तर आगाराच्या प्रवेशद्वारावरील अतिक्रमण यामुळे अनेक समस्यांनी मुरबाड आगार ग्रासलाय. या सर्व बाबींवर उपाययोजना न झाल्यास भविष्यात अपघात रोखणे कठीण होईल तर अपघात पहाणे हाच पर्याय राहील अशी प्रवाशी वर्गात चर्चा सुरू आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *