Search

सा.शब्द मशालचा द्वितीय वर्धापनदिन संपन्न   

431
       मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड मधील मराठी साप्ताहिक शब्द मशालच्या द्वितीय वर्धापनदिनाचे औचित्य साधून  मुरबाड मधील तळागाळातील मान्यवरांचा सत्कार करून वर्धापनदिन साजरा करण्यात आला.  हा कार्यक्रम मुरबाड शहरातील वीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील सभागृहात साजरा करण्यात आला.
      यावेळी तालुक्यातील दुर्लक्षित व्यक्तींचा तसेच प्रशासकीय कामकाजात कर्तव्यदक्ष असलेल्या पत्रकाराचा शाल, तुळशीचे रोप व संविधान प्रास्ताविकाच्या प्रतिमा देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला. मुरबाड तालुक्यासह अनेक जिल्ह्यांत अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या मराठी साप्ताहिक शब्द मशालचा द्वितीय वर्धापनदिनी अनेक मान्यवरांनी उपस्थितीत दाखवत शुभेच्छा दिल्या.              ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, सिडकोचे माजी अध्यक्ष प्रमोद हिंदुराव, रिपाई सेक्युलरचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रविंद्र चंदने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय बोराटे , मुरबाड बार असोसिएशनचे अध्यक्ष संतोष झुंजारराव यांच्या सह अनेक राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. साप्ताहिक शब्द मशालचे संपादक सुरेश भालेराव, कार्यकारी संपादक किशोर गायकवाड, विशेष प्रतिनिधी सुनील भालेराव यांच्या कार्याचे मान्यवरांनी तोंडभरून कौतून केले.Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *