BREAKING NEWS
Search

दत्तात्रय मुसळे – सामाजिक चळवळीतील एक उभारते नेतृत्व 

475
          शिरूर,पुणे : (प्रा.सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक सारख्या ग्रामीण भागातील असलेले व शेती हा एकमेव व्यवसाय असलेले पण सामाजिक क्षेत्र,शेती व शेतकऱ्यांशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांचा सखोल अभ्यास करून अनेकांना वेळेवेळी योग्य मार्गदर्शन व मदत करणारे राष्ट्रीय मानवाधिकार आणि भ्रष्टाचार निवारण भारतचे पुणे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय मुसळे हे मागील वर्षांपासून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत शेतीविषयी,वीजे संदर्भातील व इतर ही विविध प्रश्न यशस्वीपणे सोडविण्याचे काम करीत आहेत.
           सध्याच्या अत्यंत कठीण परिस्थितीत कुणालाही कुठला मोकळा स्वास घ्यायला वेळ नसताना देखील जनसेवेचे व्रत घेतलेले अतिशय संयमी आणि दूरदृष्टी असलेले  राष्ट्रीय मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण भारत समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय मुसळे आपला मूळ शेती व्यवसाय सांभाळत समाजातील गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी तत्पर उभे रहात आहेत. या माध्यमातून समीक क्षेत्रात काम करताना मुसळे यांनी ना कोणता राजकीय स्वार्थ, ना कोणतेही आर्थिक मानधन,अपेक्षा धरीत फक्त आणि फक्त समाजसेवा हा एकमेव उद्देश निरंतर सुरु ठेवला आहे. प्रारंभी शिरूर तालुका अध्यक्षपद मिळाल्याने त्यांनी वर्षभरात जनतेचे विविध प्रश्न सोडविण्यास सातत्याने प्राधान्य दिले. त्यांच्या चांगलया कामाची पावती म्हणून त्यांना अल्पावधीतच संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. दत्तात्रय मुसळे यांच्या बरोबर खांद्याला खांदा देत भक्कम साथ देणारे तालुका अध्यक्ष बाबाजी रासकर,राज्य बळीराजा संघटनेचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंतराव भाकरे,तालुका अध्यक्ष सोनभाऊ मुसळे व अन्य सहकारी,शेतकरी यांची मोलाची साथ मिळत असल्याने विविध प्रश्नांना वाचा फोडण्यात मुसळे यांना यश मिळत आहे.दत्तात्रय मुसळे यांच्या या निस्वार्थी समाजसेवेचे अभिनंदन,कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *