( function( wp ) { if ( ! wp ) { return; } wp.plugins.registerPlugin( 'classic-editor-plugin', { render: function() { var createElement = wp.element.createElement; var PluginMoreMenuItem = wp.editPost.PluginMoreMenuItem; var url = wp.url.addQueryArgs( document.location.href, { 'classic-editor': '', 'classic-editor__forget': '' } ); var linkText = lodash.get( window, [ 'classicEditorPluginL10n', 'linkText' ] ) || 'Switch to classic editor'; return createElement( PluginMoreMenuItem, { icon: 'editor-kitchensink', href: url, }, linkText ); }, } ); } )( window.wp ); मुरबाड रेल्वे साठी मुरबाडकर आक्रमक ; कल्याण - मुरबाड -नगर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने मुरबाडमध्ये बैठकीचे आयोजान - समाजशील मुरबाड रेल्वे साठी मुरबाडकर आक्रमक ; कल्याण - मुरबाड -नगर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने मुरबाडमध्ये बैठकीचे आयोजान - समाजशील
BREAKING NEWS
Search

मुरबाड रेल्वे साठी मुरबाडकर आक्रमक ; कल्याण – मुरबाड -नगर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने मुरबाडमध्ये बैठकीचे आयोजान

207

बैठकीसाठी उपस्थीत राहण्याचे सर्व नागरिकांना आवाहन

मुरबाड, ठाणे (-प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) : राज्यातील अनेक वर्ष राजकीय आश्र्वासित कल्याण मुरबाड नगर रेल्वे चा प्रश्र्न मार्गी लावण्यासाठी आता मुरबाडकर आक्रमक झाली आहे. केंद्रिय राज्य मंत्री व खासदार कपिल पाटील यांनी मुरबाड नगरपंचायत निवडणूक वेळीं मुरबाड रेल्वेचे सप्टेंबर 2022 अखेर पर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होईल असे आश्र्वासन दिले होते. मात्र आता डिसेंबर 2022 संपत येत असताना रेल्वेच्या कामाची कुठेही सुरूवात होताना दिसत नाही. यामुळे कल्याण- मुरबाड- नगर रेल्वे संघर्ष समितीने मुरबाड सर्वाजिक बांधकाम विभागाच्या म्हसा रोड वरील शिवनेरी विश्राम गृहात  रविवार दिनांक 11 डिसेंबर  2022 रोजी सकाळीं 11 वाजता बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला सर्व  नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. तर ही कुठल्याही राजकिय पक्षाची बैठक नसल्याचे ही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे.
    मार्च 2019 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, तत्कालीन रेल्वमंत्री यांनी ऑनलाईन कल्याण- टिटवाळा- मुरबाड उपनगरी रेल्वेच्या कामाचे भूमिपूजन करून मुरबाड रेल्वेची ग्वाही दिली. मात्र 2019 पासुन फक्त आशावाद पेरला गेला तर यापूर्वी फक्त निवडणुकीत मते मिळण्यासाठी या मुद्याचा वापर करण्यात आला. युती सरकार व  महाविकास आघाडी सरकारनेही या रेल्वे साठी निम्मा अर्थिक भार उचलण्याचे स्पष्ट केलं तत्कालीन राज्यांचे अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले होते. मात्र त्यात राजकारण करत जनतेची दिशाभूल करण्यात आली. याच काळात मुरबाड नगरपंचायत निवडणुकीत केंद्रिय राज्य मंत्री व खासदार कपिल पाटील यांनी सप्टेंबर 2022 कामाला सुरूवात होणार हा आशावाद निर्माण केला मात्र ते सत्यात न उतरल्याने पुन्हा मुरबाड करांची फसवणुक अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान च्या काळात या मार्गावर मालवाहतूक या बाबत प्रश्न उपस्थित झाला मात्र उपनगरी रेल्वे हि प्रवाशी वाहतूक करण्यासाठीं असताना मालवाहतुकीचा प्रश्न येतोच कुठे? असा प्रश्र्न उपस्थित केला जात आहे. कधी कल्याण टिटवाळा, मुरबाड, कधी कल्याण शहाड अबिवली मुरबाड, कधी बदलापूर मुरबाड तर कधी कल्याण मुरबाड नगर रेल्वेचे गाजर सर्वच सरकारने दाखवले पण आता मुरबाडकरानी रेल्वेसाठी रस्त्यांवर उतरण्याची तयारी ही दाखवली आहे. भविष्यात राजकीय पक्षांना याचा परिणाम भोगावा लागेल अशीच स्थिती असताना आता मुरबाडकर आक्रमक झाले असून, कल्याण मुरबाड नगर रेल्वे संघर्ष समिती या बैठकीचे आयोजन केले असून रेल्वे, बाबत काय भुमिका समिती घेते याकडे सर्वांचं लागले आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *