मुरबाडमध्ये ग्राहकांना मिळाले लिकेज गॅस सिलेंडर – ग्राहकांमध्ये घबराट

748
      मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड शहरातील मुरबाड – म्हसा रोडवर अंजनी गॅस एजन्सीचे गॅस वितरण केंद्र सुरू असून या वितरण केंद्रावर अनेक सिलेंडर लिकेज निघाल्याने ग्राहकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
     याबाबत अंजनी गॅस एजन्सी कार्यालयाशी संपर्क साधला असता आम्ही सिलेंडरच्या टाक्या लिकेज येत असल्याचे कंपनीला अनेक वेळा कळवले. मात्र या तक्रारीला सोडविण्यात अजून आम्हाला यश न आल्याचे सांगितले. मात्र यामुळे प्रत्येक ग्राहकाला वितरित केलेल्या अशा गॅस टाक्यांमुळे ग्राहकाच्या जीवाशी खेळ होत असल्याचे मुरबाडमध्ये आता बोलले जात आहे. मुरबाड शहरातील अनेक ग्राहकांच्या घरी गॅस घरपोच होत नसल्याने त्यांना या ठिकाणी येऊन सिलेंडर घेऊन जावा लागतो. त्यातच सिलेंडर लिकेज निघाल्यास परत परत फेरी मारून वेळ व पैसा खर्च करावा लागत आहे. वितरण होणाऱ्या सिलेंडर चे वजन करण्यासाठी कुठलीही सुविधा नाही.अनेक वेळा गॅस कमी असल्याचा तक्रारी ग्राहकाकडून येतात.मात्र याकडे काना डोळा केला जातो. यासाठी गॅस वितरण केंद्रावर वजनकाटा ठेवण्याची मागणी केली जात आहे .मुरबाड तहसीलदार  कार्यालयात ही याबाबत अनेक वेळा तक्रारी जातात.मात्र प्रशासनाकडूनही याकडे कानाडोळा केला जात आहे. ग्राहकांना मिळणारा कमी गॅस तसेच अनेकदा लिकेज सिलेंडर टाकी मिळत असल्याने लिकेज मुळे कुठलीही दुर्घटना होऊ नये यासाठी तरी काही महत्वाची उपाय योजना व्हावी अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *