बिबट्याच्या हल्ल्यात दोन कालवडी ठार ; परिसरातील नागरिक भयभीत

660
पिंपरी पेंढार,ता.जुन्नर (-प्रतिनिधी, अशोक डेरे) : उंब्रज नंबर दोन (शेरताटी मळा) ता. जुन्नर येथील बाळाजी भिकाजी दांगट यांच्या दोन वर्षे व दीड वर्ष  वयाच्या दोन कालवडी बिबट्याने हल्ला करून ठार केले. जुन्नर तालुका हा बिबट्या प्रवनक्षेत्र असलेला तालुका आहे. या ठिकाणी बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. दोन दिवसांपूर्वी खामुंडी येथे पाळीव कुत्र्यावर हल्ला करून त्याला फस्त केले होते.   नेहमीच बिबट्याच्या दहशतीखाली असलेला उंब्रज, काळवाडी, पिंपरी पेंढार, पिंपळवंडी या परिसरात कायमच बिबट्यांचे हल्ले होत असतात. अशाच हल्ल्यात शनिवार दि 4 रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास बाळाजी दांगट यांच्या गोठ्यात असलेल्या दोन वर्षे व दीड वर्षे वयाच्या कालवडीवर बिबट्याने हल्ला करून ठार केले. सदर या घटनेनंतर वनखात्याचे कर्मचारी व अधिकारी एस के साळुंके, इ. पी. विभुते, बी. के. खर्गे, सुरेश गायकर, यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. पशुवैद्यकीय अधिकारी खिल्लारी यांनी पोस्टमार्टम केले.
                यापरिसरात बिबट्यांची संख्या दिवसें-दिवस झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे त्यांचे अपघाती मृत्यूही होत आहेत. त्यामुळे बिबट्यांचे वारंवार अपघाती मृत्यू व त्यांचे होणारे हल्ले यावर कायमस्वरूपी उपाययोजना होण्याची मागणी परिसरातली जनसामान्य नागरीकाकडून होत आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *