मुरबाड,ठाणे : मुरबाड नगरपंचायतीची धडक कारवाई, राष्ट्रीय महामार्ग 61 वरील अतिक्रमण हटवले, शहरातील फुटपाथ व धोकादायक विजेचे खांब मात्र जैसे थे

617
        मुरबाड,ठाणे : मुरबाड शहरातील तीन हात नाका परिसरातील राष्ट्रीय महामार्ग 61वरिल अतिक्रमण आज नगरपंचायतीने बुलडोज़र लावुन जमिनदोस्त केले. वाहतुकीस अडचण ठरणारे व नुकताच या परिसरात माजी नगराध्यक्ष किसन कथोरे यांचा मावसभाऊ भालचंद्र वेंखडे याचा याच परिसरात झालेल्या आपघाती मृत्यु च्या घटनेनंतर तात्काळ  अतिक्रमणावर कारवाई सुरु करण्यात आली. या कारवाई कडे आज सर्वाचे लक्ष वेधले होते.
   मुरबाड शहरात नियोजन आभावा मुळे असेच आपघाचाचे प्रसंग घडण्याची स्थिती लक्षात घेता मुरबाड मनसेने रस्त्यालगत असलेले फुटपाथ मोकळे करावे, रस्त्यातील धोकादायक पोल हटवावेत,शहरातील अतिक्रमणावर कारवाई व्हावी अश्या अनेक वेळा मागण्या करुन ही फुटपाथ व धोकादायक पोल हटविले जातील का ?
असा प्रश्न मनसेचे शहराध्यक्ष नरेश देसले यानी आजच्या कारवाई नंतर माहीती देताना सांगितले.  मुरबाड – म्हसा रोडवर ही आपघाताचे प्रमाण वाढल्याने मनसेनेच गतिरोधक  बनवण्याची मागणी केली आहे.  तर तीन हात नाका परिसरात राष्ट्रीय महामार्ग 61 वर चौक असल्याने तेथेही गतीरोधक बनवण्याची मागणी आता होत आहे. मात्र आजच्या कारवाईनंतर ज्याच्या दुकानावर हातोडे पडले त्यांनी ही  कारवाई अन्याय कारकारक असल्याचे सांगत नगरपंचायतीने अतिक्रमण हटवायचेच असेल तर सर्व च अतिक्रमण हटवा अशी मागणी केली आहे.आम्हा रोडवर धंदा करणाऱ्यावरच का कारवाई ?   शहरातील अतीक्रमण, फुटपाथ, व धोकादायक पोल बाबत  नगरपंचायत का कारवाई करत नाही ? असा उलट सवाल करत आम्हाला कुणी तरी न्याय द्या अशी मागणी केली आहे. शहरातील वाहतुकीस अडथळा ठरणारे  ऱिक्षा स्टँन्ड या गंभीर बाबीकडे नगरपंचायत दुर्लक्ष करत असून आजची कारवाई म्हणजे  जीव गेल्यावर आलेले शहाणपण असल्याची चर्चा मुरबाड शहरात सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. मात्र ही कारवाई होणारच होती अशी माहीती  नगरपंचायतीचे अधिकारी कांबळे यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
–  प्रतिनिधि,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *