चेअरमन विक्रम फडतरे यांचा सत्कार करतानाबालरंगभुमी नाट्य परिषदेच्या शिरूर तालुका उपाध्यक्ष दिपालीताई शेळके, पत्रकार राजाराम गायकवाड   

मुळशी महाराष्ट्र तांञिक पतसंस्थेच्या चेअरमन पदी विक्रम फडतरे यांची निवड

579

शिक्रापूर, ता. शिरुर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड) : कोरेगाव भिमा येथील विक्रम एकनाथ फडतरे यांची मुळशी महाराष्ट्र तांञिक पतसंस्थेच्या चेअरमन नुकतीच निवड झाली. संस्थेच्या सर्वसाधरण मिटिंग मध्ये त्यांची निवड करण्यात आली. संभाजीनगर झोन विभागाचे प्रमुख जेहेरोरुदीन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांची निवड झाली. यापुर्वी त्यांनी महावितरण मध्ये अनेक वर्ष सेवाभावी काम केले आहे. या कामांची दखल घेऊन संस्थेने माझ्या वर कामाची जवाबदारी दिली ती प्रमाणिकपणे सर्व संचालकांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे फडतरे यांनी “समाजशील ” प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. त्यांनी आजपर्यंत तळेगाव ढमढेरे , कोरेगाव भिमा, भोर, खेडशिवापूर,आपटी इतर ठिकाणी काम केले. पतसंस्थेच्या कर्मचारी तसेच सभासदांनी त्यांचे अभिनंदन केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *