कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रभावी – सरपंच अरुण मुंजाळ 

465
         कवठे येमाई,शिरूर : (सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – शिरूरच्या पश्चिम भागातील कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम प्रभावीपणे सुरु असून आज पोलिओ अंतर्गत पोलिओ डोस देण्याचे काम ही ऊत्तम प्रकारे सुरु असल्याचे प्रतिपादन कवठे येमाईचे सरपंच अरुण मुंजाळ यांनी केले ते आज कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रात ० ते ५ वयोगटातील बालकांना राष्ट्रीय पोलिओ निर्मूलन मोहिमे अंतर्गत पोलिओ डोस देण्याच्या प्रारंभी बोलत होते.
        यावेळी सरपंच अरुण मुंजाळ,आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश कट्टीमणी, तरुण उद्योजक आबासाहेब वागदरे, बाबुशा पाटील कांदळकर,नवनाथ सांडभोर,आरोग्य पर्यवेक्षक बी.डी.पठारे,संजय परदेशी,पर्यवेक्षिका पी.डी.बर्डे,आरोग्य सेविका वैष्णव,आंबिका जिवडे,आशा स्वयंसेविका विद्या उघडे व ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.
         कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या ११ गावामध्ये राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम आज रविवार दि.१९ जानेवारीस सकाळी ८ पासून सायंकाळी ६ पर्यंत प्रभावीपणे राबविली जाणार आहे.  या मोहिमेत २० बूथ व १ मोबाईल टीम कार्यरत असून आज परिसरातील बुथवर पोलिओ डोस घेण्यासाठी न आलेल्या बालकांना पुढील ३ दिवसांत घरोघरी जाऊन १२ टीमच्या माध्यमातून हा डोस देण्यात येणार असून या मोहिमे अंतर्गत परिसरातील एकूण १८३९ लाभार्थी बालकांना हि लास देण्यात येणार असल्याचे डॉ. कट्टीमणी यांनी सा.समाजशिलशी बोलताना सांगितले.आज सकाळ पासूनच प्राथमिक आरोग्य केंद्रात बालकांना ही लस देण्यासाठी पालकांची मोठी गर्दी झाली होती.
        तर कान्हूर मेसाई प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत पोलिओ डोस देण्यासाठी ६ बूथ वर बालकांना ही लस देण्याचे काम सकाळीच सुरु करण्यात आले असून कान्हूर मेसाई,मिडगुलवाडी, खैरेवाडी येथील ४०० लाभार्थी बालकांना आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका यांच्या मदतीने आजच ही लस ० ते ५ वयोगटातील सर्व बालकांना देण्याचा मानस असल्याचे कान्हूर मेसाई आरोग्य उपकेंद्राच्या आरोग्य सेविका प्रियंका लंघे यांनी सांगितले.
      कवठे येमाई प्राथमिक आरोग्य केंद्रातून रुग्नांना मिळणारे उपचार,आरोग्य सेवा सुविधा व परिसर स्वच्छता पाहून ग्रामस्थांनी सामाधान व्यक्त केले.तर भविष्यात रुग्नांच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर सेवा देवु असे आश्वासन डॉ. राजेश कट्टीमणी यांनी दिले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *