टाकळी हाजीचे अनंत दगडु पवार व भिमाबाई अनंत पवार आदर्श माता पिता पुरस्काराने सन्मानित  

471
        टाकळी हाजी,शिरूर : (प्रतिनिधी,सतीश भाकरे) – टाकळी हाजी ता.शिरुर येथील प्रगतशील शेतकरी अनंत दगडु पवार व भिमाबाई अनंत पवार या दांपत्याला आज सुसंगत फाउंडेशन पुणे तर्फे राज्य स्तरीय आदर्श माता पिता पुरस्कार प्रसिद्ध साहित्यिक व संत साहित्याचे आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ.रामचंद्र देखणे यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी राज्यातील ४२ आदर्श माता व पिता यांना राज्य स्तरिय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

जेष्ठ विचारवंत,माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सुसंगत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधाकर न्हाळंदे उपाध्यक्ष धोंडिराम गडदे, दि कॉसमॉस को ऑप बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रल्हाद कोकरे, खजिनदार/विश्वस्त सतिश खाडे, विश्वस्त अँड.वैशाली करे ,विश्वस्त सौ.सरला घुगे सुनिल धनगर यांच्याबरोबर शिरूर पंचायत समितीच्या माजी सदस्या डॉ कल्पनाताई पोकळे डॉ भानुदास कुलाळ प्रगतशिल शेतकरी बाळासाहेब थोरात चेअरमन अर्जुनराव घोडे देविदास पवार पोपटराव सरोदे रामदास कांदळकर भास्कर बारहाते संभाजी साबळे शिवाजी गावडे  बाबाजी बारहाते विविध मान्यवर उपस्थित होते या दांपत्याचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *