चंद्रभागा व  उपनद्यांच्या शुद्धीकरणासाठी ‘नमामि चंद्रभागा’ अभियानासंदर्भात पुण्यात बैठक संपन्न – शरद पवार यांची उपस्थिती   

329

      शिरूर,पुणे : (देवकीनंदन शेटे,संपादक) – चंद्रभागा नदीच्या उपनद्यांच्या शुद्धीकरणासाठी महाराष्ट्र शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या ‘नमामि चंद्रभागा’ अभियाना संदर्भात साखर संकुल, पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क व कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.
या बैठकीत पुणे विभागाचे विभागीय आयुक्त म्हैसेकर व इतर संबंधित अधिकाऱ्यांनी नद्या प्रदूषित होण्याची कारणमीमांसा सांगून त्यावर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबतचे एक उत्तम सादरीकरण प्रस्तुत केले.
इंद्रायणी व इतर नद्यांच्या काठांवर असणाऱ्या औद्योगिक वसाहतींमधून नद्यांमध्ये येणारे प्रदुषित पाणी व कचरा तसेच सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीचे जल प्रदूषणापासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असल्याचे या सादरीकरणातून स्पष्ट करण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *