रस्त्याच्या कामाची पाहणी करताना  नगरसेवक नरेंद्र गिरासे

अखेर महादेपुरा परिसराती मुख्य रस्त्याच्या कामास सुरुवात  

369

दोंडाईचा, धुळे (प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : गेल्या अनेक वर्षांपासून धूळ खात पडलेल्या शहरातील महादेपुरा परिसराती मुख्य रस्त्याचे कामास सुरुवात झाली आहे. रस्त्याच्या काम चांगले झाले पाहिजे यासाठी महादेवपुरा भागातील नगरसेवक या कामाकडे लक्ष देत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता दुर्लक्षित असल्यामुळे  या रस्त्यावरून वाहतूक करणे जिकरीचे झाले होते. या रस्त्यावरून चारचाकी दुचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणावर वाहातून सुरु असते.अनेक शाळकरी विद्यार्थी, विद्यार्थिनी सुद्धा याच रस्त्याने प्रवास करीत आहेत. नगरसेवक नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, सामाजिक कार्यकर्ते सरजू नाईक, रोहित ठाकूर, आदींनी नुकतीच रस्त्याच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना काम चांगले प्रतिचे झाले पाहिजे अशा सुचना केल्या आहेत. रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *