दोंडाईचा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

475

दोंडाईचा,धुळे (-प्रतिनिधी, समाधान ठाकरे) : दोंडाईचा येथे शिवजयंती उत्सव समिती व विविध सामाजिक कार्यकर्ते, शिव भक्तांनी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. शिवजयंती या महाउत्सवानिमित्ताने दोंडाईचा शहरातील तमाम मावळ्यांच्या उत्साहाला उधाण आले होते. तरुण मावळ्यांच्या भुमिकेत साक्षात छत्रपती शिवाजीराजे आवतरलेले पाहवयास मिळत होते. शहरात चौका-चौकात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने दुचाकी रॅली शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेत तोफेच्या माध्यमातून पुष्पवृष्टी करण्यात आली. यामुळे मिरवणुकीत उत्साह संचारला होता. या शोभायात्रेत महिला ढोल पथक, लेझीम पथक, सहभागी झालेले पाहायला मिळाले. यावेळी विविध खेळांचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले. पारेश्वर महादेव मंदिरापासून शोभायात्रेला सुरुवात झाली. शोभायात्रेच्या मार्गावर पाण्याची व्यवस्था, तसेच केळी, सरबत वाटपाची सोय करण्यात आली होती.अतिशय शिस्तबध्द पध्दतीने शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी शिवाजी महाराजांचा सजीव देखावा सादर करण्यात आला. तसेच पिंपळनेर तालुक्यातील सुरजा माळ येथील आदिवासी टिपरी नृत्य, नाशिक येथील मार्तंड भैरव यांचे महिला-पुरुष ढोल पथक, नंदुरबारचे ढोल लेझीम पथक खास आकर्षण ठरले. शोभायात्रेत शिवकालीन मावळे अश्व देखावा सादर करण्यात आला. रात्री दादासाहेब रावल स्टेडियमवर झालेला शिवराज्य दर्शन सोहळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *