मुरबाडच्या नगराध्यक्षापदी छाया चौधरी ; 25 फेब्रुवारी रोजी होणार औपचारिक घोषणा

647

मुरबाड (-प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायतच्या चौथ्या नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर यांनी 4 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिल्यानंतर पाचवा नगराध्यक्ष कोण? अशी चर्चा सुरू होती. 20 फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना   25 फेब्रुवारी रोजी निवड करणार असल्याचे जाहीर करण्यात आले असताना, नगराध्यक्ष पदासाठी प्रभाग क्र. 16 मधून भाजप पुरस्कृत अपक्ष नगरसेविका छाया चौधरी यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने पाचवा नगराध्यक्ष पदाची चर्चा संपली असून, 25 फेब्रुवारी रोजी पाचव्या नगराध्यक्षा पदाची औपचारिक घोषणा करणे बाकी राहिले आहे. मुरबाड नगरपंचायतचा पाचवा नगराध्यक्ष आमदार किसन कथोरे हे निश्चित करणार असल्याचे सर्व नगरसेवक वर्गाला माहीत असून या पदासाठी नीता गडगे, साक्षी चौधरी, कस्तुरी पिसाट, छाया चौधरी, नंदा शेळके यांच्यात रस्सी खेच व नावाची चर्चा रंगली होती. मात्र यांपैकी कोणत्या नगरसेवकावर कृपादृष्टी होणार याची चर्चा असताना अपक्ष निवडणूक लढवून निवडून येणाऱ्या छाया चौधरी यांनी एकमेव अर्ज दाखल केल्याने त्यांच्या नगराध्यक्षा पदी निवड झाल्याची फक्त घोषणा होणे बाकी आहे. मुरबाड नगरपंचायत मध्ये 19 नगरसेवका पैकी 1 काँग्रेस, 1 अपक्ष,  3 शिवसेना तर  शिवसेनेचे 2 नगरसेवक यांनी भाजपात प्रवेश केल्याने भाजपची नगरसेवक संख्या 16 असताना अपक्ष निवडणूक लढवून भाजपला पाठींबा देणाऱ्या नगरसेविकेला पाचवा व शेवटचा नगराध्यक्षा पद मिळाल्याने पक्षात चलबिचल सुरू असून आमदार किसन कथोरे यांनी पंचायत समिती मुरबाड मध्ये भाजपचे पूर्ण बहुमत असताना उपसभापती पदी शिवसेनेचे अनिल देसले यांना संधी दिल्याने मुरबाड मधील राजकीय सूत्र बदलत असल्याचे दिसत आहे. मुरबाड नगरपंचायतचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपणार असून छाया चौधरी यांना आठ महिने कामाची संधी मिळणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकाम वादात चर्चेत आलेली नगरपंचायत चा कारभार छाया चौधरी कशा प्रकारे हाताळतात याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *