3 महिन्यात मंचर एस टी आगार सूरु होणार – दिलीप वळसे पाटील 

433

   मंचर ता.आंबेगाव : ( सुभाष शेटे,कार्यकारी संपादक) – मंचर येथील एस टी बस आगार सुरु करणेबाबत आज बुधवार दि.२६ रोजी राज्याचे कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मंत्रालयातील दालनामध्ये या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस परिवहन मंत्री अनिल परब, डेप्युटी जनरल मॅनेजर तथा सचिव सुपेकर, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तसेच विभागीय नियंत्रक,पुणे विभाग व अन्य अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

बैठकीमध्ये पुढील ३ महिन्यांमध्ये मंचर बस आगार सुरु करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासित करण्यात आले असून बस आगार सुरु करण्यासाठी काही प्रशासकीय अडचणी असल्यास परिवहन मंत्री यांचे आदेश घेण्यात यावेता असेही परिवहनमंत्री परब यांनी बैठकीत स्पष्ट केले. तर कामगार व राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी असेही सूचित केले की, सध्या आंबेगाव तालुक्यामध्ये राजगुरुनगर व नारायणगाव या बस आगारामधून बससेवा सुरु आहे. या सर्व बससेवा, कर्मचारी, अधिकारी वर्गासह मंचर बसस्थानाकडे वर्ग करण्यात याव्यात व तातडीने बस आगार सुरु करण्यात यावे असे सूचित केले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *