मुरबाड नगरपंचायतचा 29 कोटी शिलकी चा अर्थसंकल्प सादर

778

मुरबाड (-प्रतिनिधी, जयदीप अढाईगे) : मुरबाड नगरपंचायतचा सन २०२० ते २०२१ चा २९ कोटीचा शिलकी अर्थसंकल्प शुक्रवारी २८ फेब्रुवारी २०२० रोजी  जाहीर करण्यात  आला. नगरपंचायतीच्या कार्यालयात नवनिर्वाचित नगराध्यक्षा छायाताई चौधरी व उपनगराध्यक्षा अर्चना विशे यांच्या प्रमुख उपस्थितीत२९ कोटीचा हा अर्थसंकल्प सादर केला असल्याची माहिती नगरपंचायतीचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत  सांगितले. सदरचा अर्थसंकल्प हा कोणत्याही प्रकारे करवाढ नसलेला शिलकी अर्थसंकल्प असल्याचे     यावेळी सांगण्यात आले. या अर्थसंकल्पात मूलभूत सुविधा जास्त प्राधान्य  प्रोत्साहन अनुदान, अग्निशमन केंद्र बांधणे, मिनी फायर वाहन खरेदी करणे, दुर्बल घटक योजना, नवीन प्रशासकीय इमारत बांधणे, दिव्यांग निधी, यांच्यासह अनेक मूलभूत सुविधांसह अर्थसंकल्पात चांगलेच प्राधान्य देण्यात आले आहे. अर्थसंकल्प सादर करताना झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्याधिकार्‍यांना पत्रकारांनी अनेक समस्यांचा पाढा वाचला काही पत्रकारांनी अनधिकृत बांधकाम, पंचायत समिती ची भिंत व अपूर्ण गटारी रस्त्यावरील पोल हटविणे, पार्किंग समस्या, व नगरपंचायतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळील घाणीचे साम्राज्य हटविण्याबाबत चर्चा केली, अशाप्रकारच्या समस्या लवकर  मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्याधिकारी परितोष कंकाल यांनी दिले. मात्र या आगोदर हि अशा आश्वासनांची खैरात केली. मला आज पर्यंत कुठलाही ठोस पर्याय न केल्याने नाराजी व्यक्त केली. तसेच मागील वर्षी सन २०१९ ते २०२० या वर्षी अर्थसंकल्प २७ कोटींचा होता. यंदा मात्र या अर्थसंकल्पात 29 कोटीची तरतूद करून अर्थात वाढवू दोन कोटीचा अर्थसंकल्पात भर पडली आहे त्यामुळे या अर्थसंकल्पामुळे मुरबाड वासियांना विकासाच्या दृष्टीने मांडण्यात आलेला अर्थसंकल्प हा योग्य असल्याच्या प्रतिक्रिया नवनिर्वाचित नगराध्यक्षा छाया चौधरी व उपनगराध्यक्षा अर्चना विशे यांनी व्यक्त केली आहे. या अर्थसंकल्पात नगरपंचायत नव्या इमारती साठी 1 कोटी, रस्त्यावरील पथदिवे 1कोटी, दलीतवस्ती ७५ लाख, गटार रस्ते व साकव ५० लाख, प्रोत्साहन अनुदान ३० लाख व दिव्यांग निधी २७ लाख यासाठी निधी प्रस्तावित करण्याबाबत सांगण्यात आले.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *