मुरबाड,ठाणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान कोणी बदलू शकणार नाही – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

768
         मुरबाड,ठाणे : देशात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे  संविधान कोणी बदलू शकणार नाही असे रोखठोख प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आंबेटेंभे येथील भिमाई स्मारक सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी केले.
          या प्रसंगी ठाणे जिल्हा रिपाई ग्रामीण अध्यक्ष बाळाराम गायकवाड, जेष्ठ नेते बी. बी. मोरे, नगरसेवक भगवान भालेराव,   कॉग्रेस चे नगरसेवक  रवींद्र देसले, मुरबाड रिपाई तालुका अध्यक्ष दिनेश उघडे, आंबेटेंभेचे स्थानिक नेते भाऊ रातांबे, दि. बुद्दिष्ट कल्चरच्या  प्रियाताई खरे यांच्या सह तालुक्यातीला रिपाईचे बहुसंख्य कार्यकतें उपस्थित होते. तर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुरबाड दौऱ्यावर आले असताना त्यांनी वांजळे येथे बुद्धविहाराचे भूमिपूजन केले तर सासणे येथील रिपाई शाखेचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी रिपाई युवा नेते मिलींद अहिरे, अण्णा साळवे यांसह रिपाईचे तरुण पदाधिकारी उपस्थित होते.
        आंबेटेंभे येथे राज्यसभेचे खासदार  रामदास आठवले यांच्या फंडातून बारा लाख रुपये निधी खर्च करुन . बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उदघाटन  रामदास आठवले यांच्या हस्ते काण्यात आले.  त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना केंद्रीय सामाजिक राज्यन्यायमंत्री रामदास आठवले म्हणाले कि, येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करावे हेच खरे बाबासाहेबांचे आजोळ आहे व स्वप्न आहे. त्यामुळे मी तुम्हाला कोणत्याही प्रकाराचे निधी कमी पडू देणार नाही. तसेच आतंरराष्ट्रीय दर्जाचे भिमाई स्मारक होणार आहे. त्यामुळे या मुरबाड परिसराला वेगळा दर्जा मिळणार आहे. तसेच मुरबाड आंबेटेंभेचे नाव जगात होणार आहे.  यावेळी मुरबाड पोलीस उपविभागीय अधिकारी राजेंद्र मोरे, मुरबाड तहसीलदार सचिन चौधर, बांधकाम उपविभाग अभियंता आर आर सोमवंशी, मुरबाड महावितरण कंपनीचे उपअभियंता नरवाडे, पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या सह सर्व शासकीय अधिकारी उपस्थित होते.
            सामाजिक राज्यन्यायमंत्री रामदास आठवले यांच्या दौऱ्यामुळे रिपाई पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असल्याची माहिती ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष बाळाराम गायकवाड यांनी सा.समाजशीलशी बोलताना दिली.
– प्रतिनिधी,जयदीप अढाईगे,(सा.समाजशील,मुरबाड)



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *