दोंडाईचात शाहदा रोड परिसरातील तरूणांनी केले गरीबांना अन्नदान

400

दोंडाईचा,धुळे : (प्रतिनिधी,समाधान ठाकरे) – देशात सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर २१ दिवसांचे लॉकडाऊन सूरु आहे. यामुळे सर्व व्यवहार देखील ठप्प झाले आहेत. जवळपास संपूर्ण व्यवसाय बंद पडले आहेत. सर्व सामान्य गरीब कुटुंब, मोलमजुरी करणारे हवालदिल झाले आहेत. हातावर पोट भरून पोटाची खळगी भरणाऱ्या अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही गंभीर परिस्थिती पाहता आपण ही समाजाचे काहीतरी देणे लागतो या जाणिवेतून  दोंडाईचा शहरातील सामाजिक कार्यकर्ते विजू बापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाहदा रोड परिसरातील तरूण मित्रांनी प्रत्येकाच्या घरुन दहा दहा चपाती बनवून व बटाट्याची भाजी तयार करुन शंभर ते दीडशे कुटुंबाच्या पोटाला आधार दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजू बापू पाटील,समाजशील न्यूजचे दोंडाईचा प्रतिनिधी समाधान ठाकरे, जगदीश धनगर, भरत वाघ, मुकेश पाटील, दिपक पाटील, योगेश वाघ, अजय वाघ, अमोल पाटील, दिपक गिरासे, योगेश महाजन, राकेश सोलंकी, अंकुश वाघ, मच्छिंद्र कोळी, शब्बीर शेख,  कमलेश मराठे, दानेश, नयनेश धनगर, आदी उपस्थित होते.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *