खरबावाडीला मिळणार २ दिवस शिवथाळी – नंतर घरपोच धान्य,स्थानिक पत्रकारांनी केली जेवणाची सोय  

450
        मुरबाड,ठाणे : (प्रतिनिधी,जयदीप अढाईगे) – मुरबाड तालुक्यातील खरबावाडीला २ दिवस शिवथाळी भोजन मिळणार असून  नंतर त्यांना तांदूळ,गहू,तूरडाळ असे घरपोच धान्य देण्यात येणार असल्याचे  तहसिलदार अमोल कदम यांनी सांगितले.
      संचार बंदी मुळे हाताला काम नाही शिल्लक असलेले थोडेफार खाण्याचे साहित्य संपून गेले. ज्यांचे कडे काही आहे त्यांना मुरबाड शहरात कोरोना रुग्ण आढळल्याने बुधवार पासून अचानक शहरातील सर्व दुकाने बंद ठेवल्याने व कडेकोट संचार बंदी असल्याने सामान मिळाले नाही व त्यांची उपासमार आणखीन वाढली.
         बुधवारी रात्री या वाडीतील एका तरुणाने खरबावाडीत अनेक व्यक्ती उपाशी पोटी असून त्यांना कोणीही मदत करत नसल्याची माहिती पत्रकारांना दिली. मुरबाड मधील पत्रकारांनी याची दखल घेत त्यांचे साठी पिठले व भाकरीची सोय केली. काल गुरुवारी या वाडीत पत्रकार मुरलीधर दळवी, सा.समाजशीलचे मुरबाड प्रतिनिधी जयदीप अढाईगे,अरुण ठाकरे यांनी भेट दिली व कातकरी कुटुंबांची माहिती गोळा करून त्याचे व्हिडिओ तहसिलदार यांचेकडे पाठविले.तहसिलदार अमोल कदम यांनी या माहितीची दखल घेऊन वाडीतील लोकांसाठी काल गुरुवारी दुपारी शिव भोजन देण्याची व्यवस्था केली तसेच आज शुक्रवारी या  लोकांना तांदूळ,गहू,तूरडाळ असे साहित्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
       मुरबाड नगर पंचायत हद्दीतील खरबावाडीतील कातकरी कुटुंबांची ही व्यथा अशाच प्रकारे अनेक मजूर आदिवासी जगण्यासाठी धडपडत आहेत. यावेळी आमच्याकडे वाडीत फवारणी सुद्धा झाली नसून नगरपंचायत कुठल्याही सुविधा देत नसल्याचे सांगितले. मात्र आजची उपासमारी थांबल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *