औद्योगिक क्षेत्र असलेल्या सणसवाडीमध्ये कोरोनाचा शिरकाव रोखण्यास ग्रामस्थांना यश  

530

सणसवाडी, ता.शिरूर (-प्रतिनिधी, ज्ञानेश्वर मिडगुले) : देशात राज्यात व सर्वत्र कोरोना महामारी ने थैमान घातले असताना देखील शिरूर तालुक्यातील सणसवाडी औद्योगिक क्षेत्रामध्ये ग्रामस्थांच्या शिस्तबद्ध व कडक नियोजनामुळे आजपर्यंत एकही बाधित रुग्ण आढळला नाही. केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी केलेल्या सुचनांचे तंतोतत पालन केल्याने सरपंच, पोलिस पाटील व सर्वच ग्रामस्थांना कोरोना या विषाणूचा शिरकाव रोखण्यास यश मिळत आहे. बाजारपेठ, दुकाने, भाजीपाला विक्रेते यांना ठराविक वेळेत सुरक्षित अंतर ठेवणे बंधनकारक करुन वेळोवेळी सुचना, दंवडी देवून जनतेला जागृत केले जात आहे. यामुळे नागरीक व कामगार घरातच राहून सूचनांचे पालन करीत आहे. औद्योगिक क्षेत्र असलेल्या सासणवाडीमध्ये पोट भरण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांची उपासमारी होऊ नये म्हणून येथील भुजबळ बंधूंनी दोन महिने प्रतिदिन हजार लोकांना सोशल डिस्टन्स ठेऊन भोजन वाटप केले. आरएसबीसारख्या कंपन्यांनीही कामगार व परिसरातील गरजूंना दोन महिने भोजन वाटप केले. सणसवाडीतील सुजान कार्यकर्ते व बऱ्याच खोली मालकांनीही आपले भाडेकरू व जवळपासचे गरजूंना अत्यावश्यक वस्तू , पाणी तसेच भोजन देत सामाजिक बांधीलकी जपली,तर केंद्र सरकारने लॉकडाऊन शिथील केल्यानंतर परप्रांतीय कामगारांना त्यांच्या गावी जाण्यास मदत केली.  ग्रामपंचायत कर्मचारी, सफाई कामगार, नर्सेस, पोलिस गार्ड व ग्रामसुरक्षा दलाचे जवान तसेच डॉक्टर हे कोरोना योद्धे आपली कामगिरी चोख बजावत असल्याकारणाने अद्याप एकही केस सणसवाडीत सापडली नाही. तर कंपन्याचालू झाल्या असतांना कंपनी व्यवस्थापनालाही सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना दिल्या असून एवढया मोठ्या औद्योगिक परीसरात आजपर्यंत कोरोनाचा शिरकाव होवू न दिल्याने शिरूर तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी सणसवाडी ग्रामस्थांचे विशेष कौतुक केले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *