वंदेभारत मिशनअंतर्गत परदेशातून नागरिकांचे आगमन – विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर

303

पुणे : लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये पुणे विभागामध्ये  पहिल्या टप्प्यामध्ये  परदेशातून एकूण 457 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये  परदेशातून एकूण 511 व्यक्तींचे आगमन झालेले आहे. असे एकूण 968  व्यक्तींचे आगमन झालेले आहे. यामध्ये पुणे जिल्हयातील 796 व्यक्ती, सातारा जिल्हयातील 48 व्यक्ती, सांगली जिल्हयातील 39 व्यक्ती, सोलापूर जिल्हयातील 34 व्यक्ती तर कोल्हापूर जिल्हयातील 51 व्यक्तींचा समावेश असल्याची  माहिती विभागीय आयुक्त् डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *