सक्षम ग्रामपंचायतींनी घरपट्टया माफ कराव्यात

288

शिक्रापूर,ता.शिरूर (-प्रतिनिधी, राजाराम गायकवाड ) : गेल्या चार महिन्यांपासुन संपुर्ण देशच लाॅकडाऊन झाल्यामुळे सामान्य नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या चार महिन्यात नोकरी उद्योग-व्यवसाय सर्वच बंद असल्यामुळे समाजातील सर्वच घटकांना आर्थिक चणचण जाणवु लागली आहे. तसेच लॉकडाऊनचा अनेकांना फटका बसला, तर अनेकांवर उपासमार सहन करावी लागत आहे. अद्यापही अनेक ठिकाणी रेड झोन चालु आहे. यामुळे घरातच कोरोंटाईन होण्याची वेळ सामान्यांवर येत आहे. काही ठिकाणी शासनपातळीवर शिथिलता दर्शविली असल्याने व्यावसायिकांनी आपली दुकाने सुरू केली आहे. मात्र दुकांनात ग्राहक दिसुन येत नाही, त्यामुळे व्यवसायिकांमधून नाराजीचे वातावरण दिसुन येत आहे. तर अशा परिस्थितीत देखील अनेक ग्रामपंचायतींनी वार्षिक घरपट्टी भरण्यासाठी तगादा लावला आहे. सध्याच्य्या परिस्थितीत अनेकांना कोणतेही कर भरणे शक्य नसल्याने आर्थिकदृष्टया सक्षम असणाऱ्या ग्रामपंचायतींनी चालु आर्थिक वर्षाची घरपट्टी माफ करांवी अशी मागणी नागरीकांमधुन व्यक्त होत आहे. अनेक वेळेस घरपट्टी भरण्यासाठी उशीर झाल्यास पाच टक्के दंडाची रक्कम ग्रामपंचायत आकरते असते, मात्र या महामारीच्या काळात सक्षम असणाऱ्या ग्रामपंचायतींनी सामन्यांच्या घरपट्ट्या माफ करून मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचेही मत नागरीक व्यक्त करीत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *