शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर अपघात

302

पुणे (-प्रतिनिधी, सचिन दांगडे) : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ताफ्यातील पोलीस व्हॅनचा मुंबई-पुणे द्रुतगतिमार्गावर अपघात झाला. यात दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर शरद पवार यांनी स्वतः जखमींची विचारपूस केली आहे. हा अपघात आज सकाळी साडेदहाच्या सुमारास अमृतांजन पुलाखाली झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या ताफ्यासह आज सकाळी मुंबईच्या दिशेने जात होते. तेव्हा, ताफ्यातील (MH- 12 NU- 5881) ही पोलीस व्हॅन अचानक पलटी झाली. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवले असून शरद पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *