मुरबाड तालुक्यात नवीन 24 रूग्ण ,एकूण ७९ कोरोनाबाधित,मृतांची संख्या ३  

567
मुरबाड,ठाणे : (जयदीप अढाईगे,सा.सामाजशील वृत्तसेवा) –  मुरबाड तालुक्यातील  कोरोना रुग्णांची संख्या आता 79  वर पोहचली असून आज एकाच दिवशी  24 रूग्ण  बाधित  आढळून आल्याने मुरबाडची परिस्थिती गंभीर होत चालली आहे.  तर मुरबाड तालुक्यातील आस्कोत येथे घरीच कोरोनाचा उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांचा आकडा 3 वर  गेल्याने चिंता वाढली आहे.
         79  पैकी 65 रुग्णांवर उपचार चालू असून आता पर्यंत 11 रूग्ण बरे झाले आहेत.  मुरबाड पोलीस ठाण्यातील  नवे 2 पोलीस कर्मचारी व 10 कैदी  कोरोना बाधित  आढळले यामुळे  आता बाधित पोलिसांची संख्या 6 वर पोहचली आहे.  यात एका महिला कर्मचाऱ्यांचा ही समावेश आहे.  मुरबाड शहरात नगरपंचायत कर्मचारी ही बाधित आहे तर ग्रामीण भागात फक्त एक रुग्ण बाधित आढळल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
 मुरबाड पोलीस ठाण्यात सध्या भीतीचे सावट असल्याने सर्व कारभार हाताळणे तेथे कठीण झाले आहे तर  शहरातच 23 रुग्ण  आढळल्याने नागरिकांत मात्र चिंता वाढली आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *