रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात रायगड किल्ल्याच्या प्रतिकृतीला पुर्णविराम ? – रखडलेले बाधंकाम कधी सुरु होणार ?  शिव प्रेमींची प्रतीक्षा   

578
           अलिबाग,रायगड : (प्रतिनिधी,सारिका पाटील) – स्वराज्याच्या राजधानीत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातच रायगड किल्ल्याची प्रतिकृती मात्र प्रतिक्षेत ?  अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयाची मुख्य इमारत व अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मधोमध असलेल्या मधल्या गेट समोरील मोकळ्या जागेत या प्रतिकृतीच्या जागेचे नियोजन करुन बाधंकाम देखील  सुरु करण्यात आले होते.

३३ फुट लांबी, १६.५  फुट रुंदी, ४.३ फुट उंचीची या किल्ल्याची नियोजित प्रतिक्रुतीचा आराखडा तयार करुन प्रत्यक्ष कामाला ही सुरुवात झाली होती, परंतु कोवीड व चक्रीवादाळाच्या सकंटामुळे या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असले तरीही सदरचे निर्माणाधीन प्रतिक्रुतीच्या कामाची चक्रीवादळा मध्ये दुरावस्था झाली असल्याचे पाहायला मिळते.

पनवेल येथील श्री शिवसह्याद्री संस्थेने या किल्ल्याच्या बाधंकामाला सुरुवात केली असली तरीही या करीता लागणार्या निधीचे नियोजन CSR फडांतुन केले होते. दगड, विटा व वेगळ्या प्रकारच्या सिमेटंचा या बाधंकामामध्ये समावेश होता. तसेच हार्ड फायबर व जेलकोट मध्ये याचे बाधंकाम करुन ५० पेक्षा जास्त वर्ष हे बाधंकाम टिकेल असा दावा रोहीत काटकार यांनी केला. ज्यांनी या प्रतिकृतीच्या बाधंकामाचा आराखडा बनवुन सादरी करण केले होते. १०-१५ दिवसात मुख्य प्रति कृतीचे बाधंकाम पूर्णत्वास असतानाच तत्कालीन जिल्हाधिकारी डाँ विजय सुर्यवंशी यांची बदली झाली.

मागील जिल्हाधिकारी डाँ विजय सुर्यवंशी याच्यां सकंल्पनेतुन रायगड किल्याची प्रतिकृती या ठिकाणी उभारली जाणार होती. पनवेल येथे एका कार्यक्रमामध्ये डाँ. विजय सुर्यवंशी यांना किल्याची प्रतिकृती पहायला मिळाली. त्याबाबत अधिक चौकशी करुन सदर किल्ल्याच्या प्रतिकृतीचे बाधंकाम करणारी श्री शिवसह्याद्री सस्थेंंचे सस्थांपक सागर मुढें व त्याचें सहकारी रोहीत काटकर यांनाच रायगड किल्ल्याची प्रतिकृती बाधंण्याचे काम देण्यात आले होते. परंतु शिवप्रेमी व गड किल्याच्या बाबत आवड व आभ्यास असलेले डॉ विजय सुर्यवंशी यांची २२ जानेवारी रोजी बदली झाली आणि नवीन जिल्हाधिकारी यांनी येथील चार्ज घेतला.

मागील जिल्हाधिकारी डाँ विजय सुर्यवंशी यांची बदली ज्यादिवशी २२ जानेवारीला झाली त्याच दिवशी त्यांनी जाता जाता जिल्हाधिकारी यांच्या कँबिन बाहेरील लाँबी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य तस्वीरीचे अनावरण ही केले. मात्र प्रतिकृती  पुर्ण करण्याची जबाबदारी काही उच्चपदस्थ अधिका-यांकडे सोपवली.  त्यानतंर जवळ जवळ दोन महीने या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्षच झाले व २२ मार्च पासुन कोवीड चे लाँकडाउन सुरु झाले. त्या नतंर ३ जुन ला आलेल्या चक्रीवादळाचा अलिबाग लाही तडाखा बसला. समुद्र किना-या लगत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारत असलेल्या या प्रतिकृतीची मात्र दुरावस्था झाली.

या बाबत रायगड जिल्ह्यातील शिवप्रेमी कडुन मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. २२ जानेवारी नतंर दुर्लक्षा अभावी रखडलेले बाधंकाम कधी सुरु होणार ? याकडे शिव प्रेमींचे  लक्ष लागुन राहिले आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *