अलिबागमध्ये कोरोनाबाधितांची संख्या ३६७ वर ; तालुक्यास धोक्याची घंटा !

341

अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी, सारिका पाटील) : अलिबाग तालुक्यात आज ३७ रुग्ण वाढले आहे. यामध्ये खानाव, पेझारी देवलांग आळी,लोणेरे, आंबेपूर सुभाष नगर, देहेन, शहापूर, कोलटेंभी, सासवणे, चेंढरे संत रोहिदास नगर,सिध्दार्थ नगर, अलिबाग कोळीवाडा,उसर, गोंधळपाडा गोकुळेश्र्वर, चेंढरे गोल्ड कोस्ट, कातळपाडा, बहिरोळे, वरसोली, मानकुळे, गोंधळपाडा, थळ आगर, बामणोली, पिंपळभाट, श्रीबाग, आणि रामनाथ येथील रुग्णांचा समावेश आहे. अलिबाग तालुक्यातील आजपर्यंत ३६७ इतकी कोरोना बाधीतांची संख्या झाली असून, त्यापैकी २०५ जणांवर उपचार सुरू आहेत. आज पर्यंत ९ जणांचा बळी गेला असून, १५३ जण कोविड 19 बरोबर दोन हात करून बरे झाले असल्याची माहिती तहसीलदार सचिन सेजाळ यांनी दिली. तरी सर्वांनी अत्यावश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडा, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करा अशा सूचना वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून वारंवार सांगण्यात येत आहे.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *