अलिबाग तालुक्यातील आज 57 नव्या रुग्णांची नोंद ; तर एकाचा मृत्यू

300
अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : अलिबाग तालुक्यात सलग दुसर्‍या दिवशी पन्नासहून अधिक 57 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून, अलिबाग शहरातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे तालुक्यात मृतांची संख्या 14 झाली असून, एकूण बाधित रुग्णांचा आकडा 538 वर गेला आहे. यापैकी 311 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज नोंद झालेल्या रुग्णांमध्ये आरसीएफ कॉलनी कुरुळ येथील 8, आंबेळी-नागांव येथील 3, खंडाळे येथील 1, राहुलपाडा-पेझारी येथील 1, गंगासागर सोसायटी-अलिबाग येथील 3, बंदरपाडा कोळीवाडा-अलिबाग येथील 1, शहाबाज येथील 3, शिवकृपा स्वामी समर्थ नगर-पिंपळभाट येथील 1, चिंचवली येथील 6, अलिबाग शहरातील समृद्धी सोसायटी-घरत आळी येथील 4, बामणगांव-बोरपाडा येथील 1, गोंधळपाडा येथील 1, अलिबाग शहरातील बालाजी नाका येथील 1, रेवस गांव येथील 2, खारपेढांबे येथील 1, विद्यानगर येथील 2, चोरगुंडी येथील 1, ढोलपाडा खंडाळे येथील 2, सी वूड विद्यानगर येथील 1, नवेदर-नवगांव येथील 1, पेझारी येथील 1, दांडेपाडा-वरसोली कोळीवाडा येथील 4, थळ आगार येथील 3, थळ डोंगरी येथील 1, कस्टम बंदर कोळीवाडा-अलिबाग येथील 1, रामनाथ तांबोळी हॉस्पिटलजवळील गंगाई येथे 1, बोडणी 1, सर्वेश्‍वर मंदीरजवळ-नवीन देहन-अलिबाग येथील 1 रुग्णाचा समावेश आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *