आत्ता अलिबागकर करणार ऑनलाईन किराणा सामानाची खरेदी

391
अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : दिवसेंदिवस कोरोनाचं संकट वाढलं आहे. सद्यस्थितीत आपण covid-19 या आपत्तीला तोंड देत आहोत. मास्क चा वापर, सॅनिटायझर चा  वापर ,सोशल डिस्टंसिंग चा अवलंब यासारख्या सर्व उपाययोजना केल्या जात आहेत . परंतु तरीसुद्धा करोना चा प्रादुर्भाव हा कमी झालेला नाही. आज तर आलिबाग तालुक्यामध्ये 56 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी 15 ते 26 जुलै पर्यंत लॉक डाऊन देखील जाहीर केले आहे. मात्र  नियमित लागणाऱ्या गृहपायोगी वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावं लागतं. या रोगापासून बचाव करण्याकरिता अधिकाधिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन व्यवहार यावर  भर देणे आवश्यक आहे. अमेझॉन, फ्लिपकार्ट, रिलायन्स यासारख्या कंपन्या ऑनलाइन शॉपिंग करिता प्रसिद्ध आहेत.मात्र  अद्यापही किराणा माल, भाजीपाला इत्यादी वस्तू आपण बाजारात जाऊन खरेदी करतो. अद्यापही या वस्तूंना ऑनलाईन खरेदी करिता ठोस पर्याय उपलब्ध झालेला नाही आणि यामुळेच किराणा मालाचे दुकान यामध्ये, लहान शॉपिंग मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असलेली पाहायला मिळते.
           या सर्वांवरती एक उपाय म्हणून अलिबाग मधला तरुण हर्षल कदम व त्याचे सहकारी यांनी MY RAIGAD  नावाचे ॲप तयार करून ते रायगड जिल्ह्यातील ग्राहकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिली आहे. सुरुवातीला अलिबाग तालुक्या पुरती सेवा देण्याचा संकल्प केलेला आहे. आणि नंतर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सेवा देण्यासाठी  अॅप उपलब्ध होणार आहे. अलिबाग मधील तरुण अभियंत्यांनी तयार केलेल्या अॅपचे आज  अलिबाग तहसील कार्यालय  तहसीलदार सचिन सेजाळ यांच्या दालनात या अॅप चे  लोकार्पण करण्यात आले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *