आलेगावामध्ये कोरोनाचा शिरकाव ; आरोग्य तपासणी करिता आरोग्य विभाग दक्ष

419
पातूर,अकोला (-प्रतिनिधी,श्रीधर लाड) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील आलेगावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने महसूल, आरोग्य व ग्राम पंचायत तसेच पोलीस प्रशासनाने वेळीच सावधगिरी बाळगत पातूर तहसिलचे तहसीलदार दीपक बाजड यांनी तात्काळ दखल घेऊन सदर भाग सील करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आलेगांव सर्कलचे मंडळ अधिकारी विजय राठोड, तलाठी श्रीकृष्ण इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत प्रशासनाने वार्ड क्र २ मधील व ३ मधील काही भाग लोखंडी बॅरिकेट लावून सील केला. गेल्या काही महिन्यांपूर्वी  कोरोना आजाराचा प्रादुर्भाव लक्षात घेता आलेगांव ग्रा.पं.प्रशासनासह चांनी पोलिसांनी आरोग्य विभागाने खबरदारी घेऊन सर्व उपाय योजना कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी केल्या. त्यामुळे जवळपास १७,००० लोकसंख्या असलेल्या गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला नाही. दि १८ रोजी आलेगावामध्ये कोरोनाचा एक पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्याने सदर गावामध्ये एकच खडबळ उडाली असली तरी, पातूर तहसीलचे तहसीलदार दीपक बाजड यांनी वेळीच आदेश काढून सदर भाग सील करण्याचे आदेश मंडल अधिकारी विजय राठोड व तलाठी श्रीकृष्ण इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रा.पं.प्रशासनाने सदर भागातील काही भाग लोखंडी बॅरिकेट उभारून सील करून रहदारी मुक्त केला. सदर सील केलेल्या भागाची पाहणी चांनी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
तहसीलदार व तालुका आरोग्य अधिकारी यांची ग्रा.पं.प्रशासना सोबत बैठक
आलेगांव प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पातूर तहसीलचे तहसीलदार दीपक बाजड यांच्या मार्गदर्शनाखाली तातळीच्या बैठकीमध्ये गावातील ग्रामस्थानच्या आरोग्याच्या तपासणी करिता जिल्हा परिषद शाळेमध्ये रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबीराचे नियोजन व्यवस्था ग्रा.पं.प्रशासनाने केली आहे. बैठकीमध्ये तहसीलदार दीपक बाजड, तालुका आरोग्य अधिकारी विजय जाधव, वैद्यकीय अधिकारी स्नेहा चव्हाण, मंडल अधिकारी विजय राठोड, तलाठी श्रीकृष्ण इंगळे, कोतवाल विनोद बोचरे, ग्रामपंचायत सरपंच, शिवसेना तालुका प्रमुख रवींद्र मूर्तडकर, ग्रा.पं.सदस्य विजय बोचरे, गणेश ढोणे, शेरखा, संजय गावंडे, नवल काठोळे ग्रा.पं.कर्मचारी नामदेव मोहाडे सह समाजशील चे पत्रकार श्रीधर लाड, अब्दुल कदिर, ,नय्यर खान व प्रा.आ. केंद्राचे कर्मचारी व आशा कर्मचारी आदींची उपस्थिती होती. तसेच रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या व्यक्तींना क्वारंटाईम करणार असल्याचे आरोग्य अधिकारी यांनी सांगितले.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *