सैनिक निधीसाठी अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांची आर्थिक मदत ; स्वतःच्या वाढदिवसानिमीत्त जपली सामाजिक बांधिलकी 

378

अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : काॅंग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.प्रविण ठाकूर स्वतःच्या वाढदिवसी देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसानिमीत्त सैनिक कल्याण निधीसाठी भरघोस आर्थिक मदत करत असतात, त्याप्रमाणे यावर्षीही त्यांनी एक्कावन हजार रूपयाचा धनादेश रायगडच्या निवासी उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी पद्मश्री बैनाडे यांच्याकडे सुपूर्द केला. काही दिवसांपूर्वीच ऍड.प्रवीण ठाकूर यांनी करोना संसर्गाविरूध्दच्या लढाईमध्ये योध्दा म्हणून आपला जीव धोक्यात घालनू लढणा-या सर्व सरकारी अधिकारी, डाॅक्टर्स, नर्सेस, पोलीस दल, सफाई कामगार यांच्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रू. 51,000 व पोलीस दलास रू. 51,000 अशी एकूण एक लाख दोन हजार रूपयांची आर्थिक मदत केली होती. त्यानंतर त्यांनी आज सैनिक कल्याण निधीला आर्थिक मदत केल्याबद्दल त्यांचे समाजाच्या सर्व स्तरातुन कौतूक केले जात आहे. यावेळी त्यांच्या सोबत परीक्षित ठाकूर, आर.डी. पाटील इ.उपस्थित होते. सहा.जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील जे.डी.पाटील, सुभाष डोंगरे, बळीराम म्हात्रे या कर्मचारी वर्गाने  अ‍ॅड. प्रविण ठाकूर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. देशाच्या सिमांच्या रक्षणासाठी वादळवारा, पाउस, कडाक्याची थंडी अशा सर्व समस्यांना तोंड देवून कार्यरत असणा-या जवानांप्रती अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांची सैनिकांना सहायता करण्याची ही कृति संपूर्ण तरूण वर्गासाठी नव्हे तर सर्व समाजासाठी मार्गदर्शक असल्याची भावना यावेळी प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी बोलून दाखविली. देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसानिमीत्त सैनिक कल्याण निधीसाठी भरघोस देणगी अ‍ॅड.प्रविण ठाकूर देत असतात. सशस्त्र सेना ध्वजदिन निधीचे संकलन जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत केले जाते. देशावरील आपत्ती दूर करण्याचे काम बजावत असताना शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियासाठी, अपंग सैनिक, विधवा पत्नी, शहिदांचे आई-वडील व परिवारांसाठी या ध्वजदिन निधीचा उपयोग केला जातो. महाराष्ट्र शासन व सैनिक कल्याण विभाग यांच्यामार्फत या निधीचा विनीयोग होतो. अ‍ॅड.प्रविण ठाकूर यांनी यावेळी बोलताना सांगितले कि ” सैनिक कल्याण निधीला मदत करणे हे माझे कर्तव्य आहे. देशाच्या सीमेवर लढणा-या सैनिकांप्रती सामाजिक दायित्व म्हणून दरवर्शी मी मला शक्य असेल तशी मदत करण्याचा प्रयत्न करीत असतो.”




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *