अलिबाग तालुक्यातील बाधित रुग्णांची संख्या ७३९ वर 

333

अलिबाग,रायगड (-प्रतिनिधी,सारिका पाटील) : आज अलिबाग मध्ये ४४ नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील दोघे जन अलिबाग जिल्हा कारागृहातील आरोपी असल्यामुळे चिंतेची बाब वाढली आहे. तर बोडणी गाव मधील आज १८ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्याच बरोबर रामनाथ येथील एक अपार्टमेंट, चरी, नागाव दत्तमंदिर जवळ, झिराड,थरोंडे ,आर सी एफ कॉलीनी कूरुळ येथील तिघेजण, विद्यानगर, चिंचोटी नारंगी येथील दोघेजण, सोगावं, पाटील वाडी चेंढरे, कार्ले खिंड, लोणेरे, हनुमान मंदिर चेंढरे, अलिबाग एस टी स्टँड जवळ एका कॉम्प्लेक्स येथील दोघेजण, नारंगी, चौंढी वडके कॉलेज मागे दोघेजण, रेवसगाव, कार्ले, मारुतीनाका येथील एक सोसायटी येथील रुग्ण आहेत. आज शहाबाज मधील एका रुग्णाचा कोरोनाने बळी घेतला आहे. तर अलिबाग मधील २१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. अलिबाग तालुक्यात  एकूण ७३९ रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी  ३६८ रुग्णांवर उपचार चालू आहेत. आज पर्यंत १९ कोरोना बाधितांना मृत्यू झाला आहे. तर ३५२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.




Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *